चिल्ला बॉर्डरवर पोलीस अलर्ट Video
Ahead of farmers' protest, massive traffic jam, barricading on Noida-Delhi roads
- Farmers will march from Noida to Delhi to demand compensation under new farm laws.
- Farmers from Uttar Pradesh will begin their protest
- शेतकरी दिल्लीकडे करणार कूच
नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे. शेतकरी आणि अधिकारी यांच्यातील बैठक निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दीर्घ काळापासून शेतकऱ्यांनी नोएडा येथील सरकारी प्राधिकरणांना घेराव करत आहेत. रविवारी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर बैठक बोलावण्यात आली होती. परंतु मागण्या मान्य न झाल्याने शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिला.
Please click here to Watch this Video or photo on X (twitter)
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडा आणि दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहे. दिल्लीच्या सीमेवर सतर्कता बाळगून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक जागांवर बॅरिकेड्स लावले जात आहेत. शेतकरी नेत्यांना नजरकैदेत ठेवले जात आहे. दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. चिल्ला बॉर्डरवर वाहने खोळंबली आहेत. चिल्ला बॉर्डरवर दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखणं पोलिसांसमोर आव्हान आहे. याठिकाणी सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
नवीन जमीन अधिग्रहण कायद्यानुसार १ जानेवारी २०१४ पासून अधिग्रहण जमिनीवर ४ पटीने नुकसान भरपाई दिली जावी.
गौतमबुद्ध नगरमध्ये १० वर्षापासून सर्किट रेटही बदलला नाही. नव्या जमीन अधिग्रहण कायद्याचा लाभ जिल्ह्यात लागू करावा.
जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यात १० टक्के विकसित भूखंड दिला जावा.
६४.७ टक्के दराने नुकसान भरपाई द्यावी.
शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार आणि पुनर्विकासात लाभ द्यावा.
हाय पॉवर कमिटीच्या शिफारशी लागू करा.
केव्हापासून सुरु आहे आंदोलन?
नोएडा येथील शेतकरी आज दिल्लीच्या दिशेने येणार आहेत. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना अथॉरिटीविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. २७ नोव्हेंबरला शेतकऱ्यांनी ग्रेटर नोएडा प्राधिकरणाविरोधात आंदोलन केले. २८ ते १ डिसेंबरपर्यंत यमुना विकास प्राधिकरणाबाहेर निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु होती. रविवारी शेतकरी आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आंदोलनकारी शेतकरी सर्वात आधी महामाया ब्रीजजवळएकत्रित जमणार आहेत. तिथून दिल्लीपर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढणार, गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगड, आगरासह २० जिल्ह्यांतील शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लागू केला आहे. दिल्लीच्या चहूबाजूने कडेकोड सुरक्षा व्यवस्था आहे. दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेड्स लावले असून तिथे तपासणी करूनच आत प्रवेश दिला जात आहे.
Traffic has been severely hit in parts of Delhi and Noida ahead of the farmers' 'Delhi Chalo' march towards the Parliament complex on Monday
Mahamaya Flyover in Noida and march towards Delhi on foot and tractor
Thousands of farmers began a protest march from Noida to Delhi today, demanding fair compensation, better crop prices, and loan waivers. Organised by various farmer unions, the march is expected to end at Jantar Mantar.
The protest is being held to demand compensation and benefits related to agricultural reforms, including a legal guarantee
#FarmersProtest #DelhiProtest #NoidaFarmers #ChillaBorder #TrafficJam #PoliceAlert #FarmersMarch #CompensationDemand #AgricultureLaws #UttarPradeshFarmers #ProtestAlert #Barricading #FarmersRights #DelhiTraffic #FarmersUnity #KisanAndolan #ProtestInDelhi #FarmersStruggle #KisanMarch #DelhiPolice