24 तासांत तब्बल 46 सेंमी पाऊस | Cyclone Fengal
Cyclone Fengal caused widespread devastation, bringing record rainfall and flooding to Puducherry
Cyclone Fengal unleashed unprecedented rainfall
फेंगल चक्रीवादळ 3 डिसेंबरच्या आसपास केरळ-कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता
Cyclone Fengal : Puducherry receives highest rainfall in 30 years : पुड्डुचेरी : फेंगल चक्रीवादळामुळे देशभरातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तिरुअनंतपुरम आणि कोल्लम वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Please click here to Watch this Video or photo on X (twitter)
फेंगल चक्रीवादळामुळे शनिवारी सायंकाळपासून दक्षिणेत अनेक भागांत पाऊस सुरु झाला असून, हे वादळ पुदुच्चेरीजवळ स्थिरावले आहे. या वादळामुळे पुदुच्चेरीत जनजीवन विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळ कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत झाले असून त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता वादळ पुदुच्चेरीजवळ धडकले. रात्री साडेअकरापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली. या वादळाचा जोर आता ओसरत असून, यादरम्यान पुदुच्चेरीत २४ तासांत ४६ सेंमी पावसाची नोंद झाली आहे.
वादळामुळे तामिळनाडूतही अनेक भागांत पाऊस सुरू असून, चेन्नईत अनेक विमानसेवा रविवारीदेखील प्रभावित झाली होती. तामिळनाडूत विल्लूपुरम जिल्ह्यात ९ तासांत ५० सेंमी पाऊस पडला. काही स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनुसार सुमारे ३० वर्षांनंतर पुड्डुचेरीत पाऊस किंवा वादळामुळे अशी गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.
पावसामुळे रस्ते, वसाहती जलमय झाल्याने अनेक भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी मदत शिबिरांत पूरग्रस्तांना अन्न पुरवण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. स्थानिक प्रशासन, पोलिस, लष्करासह विशेष बचाव पथकांचा बचावकार्यात सहभाग आहे.
फेंगल चक्रीवादळामुळे शनिवारी रात्रीपासून बहुतांश भागांत वीजपुरवठा खंडित असून, पाण्यामुळे लोक घरातच अडकून पडले आहेत. अनेक घरांत पाणी शिरले असून, पार्किंगमध्ये लावलेली वाहने पाण्यात आहेत. वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागांत वृक्ष उन्मळून पडले आहेत. सुमारे ५० हजार नागरिक प्रभावित झाले आहेत. त्यांना अन्न व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दिली.
केरळमधील मुसळधार पावसानं सर्व जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. हे नियंत्रण कक्ष तालुका आणि जिल्हा स्तरावर 24/7 कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत 1077 किंवा 1070 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधून नागरिकांना तत्काळ मदत मिळू शकते.
मुसळधार पाऊस सुरू असल्यानं मुख्यमंत्री पुनराई विजयन यांनी भूस्खलन प्रवण परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असलेल्या नागरिकांनी आश्रय छावण्यात जावं, असं आवाहन त्यांनी केलं. किनारपट्टीवरील नागरिकांना धोका जास्त असल्यानं रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा त्यांनी दिला. रेड आणि ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये आगाऊ मदत छावण्या उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिल्या आहेत.
Puducherry has received 50 cm of rainfall, which has resulted in severe flooding. This is the highest that the Union Territory has received in 30 years.
The Indian Army evacuated over 100 people from Puducherry. The rescue operations started at 6:15 am today.
Several parts of Tamil Nadu, such as Kallakurichi, Tiruvallur, are facing heavy rainfall along with gusty winds. The IMD has also warned of flash floods in suburban areas.