1 डिसेंबरपासून होणार हे मोठे बदल
Major rule changes from December 1, 2024: Key impacts on households and finances
December 2024: Aadhaar, credit cards, FDs-financial changes to keep in mind
नोव्हेंबर महिना संपत आला आहे. दोन दिवसात डिसेंबर महिन्याला सुरुवात होईल. सरकार महिन्याच्या सुरुवातीला मोठे बदल करत असते. नवीन महिन्याच्या (डिसेंबर) १ तारखेपासून देशात लागू होणाऱ्या या प्रमुख बदलांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीतील सुधारणा आणि क्रेडिट कार्ड संबंधित बदलांचा समावेश आहे. १ डिसेंबर २०२४ पासून अनेक नियम बदलणार आहेत, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
१ नोव्हेंबरला १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. तेल आणि वायू वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किंमती सुधारतात आणि यावेळी देखील तेच दिसून येईल. अनेक दिवसापासून स्थिर असलेल्या १४ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतात. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीसोबतच विमानात वापरले जाणाऱ्या एअर टर्बाइन इंधनची किंमतही बदलले जाते. याचा परिणाम हवाई प्रवाशांवर होतो.
गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा. कारण पुढील महिन्यात 10 नवीन आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहेत. येणाऱ्या आयपीओद्वारे एकूण 20000 कोटी रुपये उभारण्याची कंपन्यांची योजना आहे.
मोफत आधार अपडेट : 14 डिसेंबरची अंतिम मुदत : आधार कार्डधारक 14 डिसेंबर 2024 पर्यंत myAadhaar पोर्टलद्वारे त्यांचे तपशील ऑनलाइन विनामूल्य अपडेट करू शकतात. या तारखेनंतर, शुल्क लागू होईल:
१ डिसेंबर २०२४ पासून मोठा बदल क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांशी संबंधित आहे. तुम्ही डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांसाठी विशेषत: SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर १ डिसेंबरपासून नवीन नियम लागू होत आहेत. SBI कार्ड्स वेबसाइटनुसार, ४८ क्रेडिट कार्ड डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स देणार नाहीत.
ज्या करदात्यांनी त्यांचे आयकर रिटर्न वेळेवर भरणे चुकवले त्यांच्यासाठी, विलंबित रिटर्न सबमिट करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2024 आहे. न भरलेल्या करांवर दंड आणि व्याज लागू होऊ शकते.
आयपीएल 2025 स्पर्धेसाठी 24 आणि 25 नोव्हेंबरला खेळाडूंवर बोली लागली. या लिलाव प्रक्रियेत दहा फ्रेंचायझींनी कोट्यवधी रुपयांची उधळण केली. अस असताना क्रीडाप्रेमींना आणखी लिलाव प्रक्रिया पाहण्याचा योग जुळून येणार आहे. Women's Premier League 2025 स्पर्धेसाठी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत ५ संघ खेळतात. तसेच प्रत्येक संघात सहा विदेशी खेळाडूंसह 18 खेळाडूंची परवानगी आहे. सर्व संघांना 15 कोटींची रक्कम ठरवली आहे.
Telecom Regulatory Authority of India (Trai) ने व्यावसायिक संदेश आणि ओटीपीशी संबंधित ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्याचा निर्णय घेतला होता. हा नियम बदलण्याचा उद्देश हा आहे की दूरसंचार कंपन्यांनी पाठवलेले सर्व संदेश ट्रेस करण्यायोग्य असतील, जेणेकरुन फिशिंग आणि स्पॅमची प्रकरणे थांबवता येतील. नवीन नियमांमुळे, ग्राहकांना ओटीपी वितरणात विलंब होऊ शकतो. या निर्णयाची अंमलबजावणी ३१ ऑक्टोबरपर्यंत करायची होती, पण अनेक Telecom कंपन्यांच्या मागणीनंतर त्याची अंतिम मुदत ३१ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. टेलिकॉम कंपन्या ट्रायचा हा नियम १ डिसेंबरपासून लागू करू शकतात.
डिसेंबर महिन्यात बँकांना मोठ्या सुट्ट्या असतात. यामुळे तुमच जर बँकेत काही काम असेलतर आधी तुम्ही बँकांच्या सुट्टीचे वेळापत्रक पाहा. डिसेंबरमधील 17 दिवसांच्या सुट्टीमध्ये शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश होतो. पुढील महिन्यात 5 रविवार येणार आहेत, त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना 6 दिवसांऐवजी 7 दिवसांची साप्ताहिक रजा मिळणार आहे.
#DecemberChanges #FinancialUpdates #Aadhaar #CreditCardRules #LPGPriceHike #InvestmentOpportunities #IPO2024 #TaxDeadline #DigitalGaming #SBIcards #HouseholdFinance #EconomicImpact #GasCylinderPrices #AviationFuel #MyAadhaar #RewardPoints #TaxReturn #FinancialPlanning #Budgeting #GovernmentPolicies