आमदाराच्या मुलीसोबत मुलाचं लग्न लावणं पडलं महागात.. #Marriage #Politics #BSP #SP
5 वेळा रामपूर जिल्ह्याचे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहिलेले सुरेंद्र सागर यांना पक्षाच्या नेत्या मायावती यांनी पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. Former Minister of State Rank Surendra Singh Sagar यांनी त्यांच्या मुलाचं लग्न समाजवादी पक्षाचे आमदार त्रिभुवन दत्त यांच्या मुलीशी 27 नोव्हेंबरला लावलं. त्रिभुवन दत्त हे एकेकाळी बहुजन समाजावादी पक्षाचे खासदार होते, परंतु आता ते समाजवादी पक्षाचे आमदार आहेत.
आमदार त्रिभुवन दत्त यांच्या मुलीचं लग्न सुरेंद्र सागर यांच्याशी मुलाशी झाल्याने मायावती यांनी सुरेंद्र सागर यांची पक्षातून हकालपट्टी केली. अलीकडेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे त्रिभुवन दत्त यांच्या आंबेडकर नगरमधील घरी आले होते. आता मायावती यांनी सुरेंद्र सागर यांच्यासोबतच प्रमोद सागर यांनाही पक्षातून बाहेर काढले. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सुरेंद्र सागर यांच्या जागी ज्ञानप्रकाश बौद्ध यांना नवीन जिल्हाध्यक्ष बनवण्यात आलं आहे. बरेली मंडलमध्ये सुरेंद्र सागर हे बसपाचे मोठे नेते मानले जायचे. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. २०२२ मध्ये मिलक विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती.
मी कुठल्याही पक्ष शिस्तीचा भंग केला नाही. केवळ माझा मुलगा अंकुरचं लग्न समाजवादी पक्षाचे आमदार त्रिभुवन दत्त यांच्याशी मुलीशी केले आहे, असं सुरेंद्र सागर यांनी सांगितले.
समाजवादी पक्षाच्या नेत्यांसोबत अशाप्रकारे संबंध ठेवणे हे अजिबात सहन केले जाणार नाही अशी भूमिका बसपाने घेतली आहे.
#Marriage #Politics #SocialMedia #BSP #SP #SurendraSagar #TribhuwanDatt #AkhileshYadav #Mayawati #PoliticalDrama #Wedding #PoliticalRelations #Leadership #Election #PoliticalNews #Family #Community #Unity #PoliticalPolitics