बेळगाव : गोव्याला जाताना तो रस्ता चुकला आणि थेट जंगलात... #GoogleMap #112Helpline
Google Map वर ठेवला विश्वास अन्...
तो रस्ता चुकला आणि गुगल मॅपच्या माध्यमातून अशा ठिकाणी पोहोचलो...
बेळगाव—belgavkar—belgaum : @खानापूर : आपल्यापैकी अनेक जण पत्ता शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर करतात. पण काही वेळेस गुगल चुकीची माहिती देतो. किंबहूना पत्ता शोधण्याच्या नादात तुम्ही वेगळ्याच ठिकाणी जातात. असाच काहीसा प्रकार बिहारच्या एका कारचालकासोबत घडला. गुगल मॅपचा आधार घेत गोव्याला जाताना चुकीच्या दिशानिर्देशामुळे तो हेम्मडगा मार्गावरील शिरोली जवळील घनदाट जंगलात पोहोचला.
अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पोलिस खात्याने सुरु केलेल्या व 24 तास कार्यरत असलेल्या 112 हेल्पलाइनमुळे बिकट प्रसंगी अनेकांना तातडीने मदत होत असल्याचा प्रत्यय पहाटेच्या सुमारास या बिहारच्या कारचालकाला आला. पोलिसांनी अवघ्या दीड तासात त्याच्या मदतीला धाव घेत त्याला सुरक्षितपणे महामार्गापर्यंत आणून सोडले.
राजदास रणजीत दास (रा. बिहार) आपल्या कारने उज्जैन येथून गोव्याच्या दिशेने जात होता. या मार्गाने तो पहिल्यांदाच प्रवास करत असल्याने रस्ता चुकू नये यासाठी त्याने गुगल मॅपचा आधार घेतला. Google Map प्रमाणे तो कार चालवीत होता. पण रस्ता चुकून तो घनदाट जंगलात शिरोली जवळ जाऊन पोहोचला. रात्रीची वेळ असल्याने निर्जन स्थळामुळे त्याची पाचावर धारण बसली. रस्ता चुकल्याचे लक्षात येताच तो घाबरला. त्याने तातडीने 112 हेल्पलाइनवर फोन करून रस्ता चुकून आपण जंगलात अज्ञातस्थळी पोहोचल्याचे सांगितले.
तो थांबलेल्या जागी सुदैवाने मोबाईल रेंज उपलब्ध होती. त्याने पोलिसांनी दिलेल्या क्रमांकावर स्वतःची लाईव्ह लोकेशन सामायिक केली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक के. आय. बडीगेर पोलीस कर्मचाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्यांनी राजदास याला दिलासा देत बेळगाव-पणजी महामार्गापर्यंत सोबत करून रस्ता दाखवून दिला.
#GoogleMap
#Belgaum #Goa #GoogleMaps #LostInTheWoods #EmergencyHelp #112Helpline #TravelDiaries #RoadTrip #Adventure #Nature #Forest #SafetyFirst #TravelSafe #Explore #Wilderness #HelpIsHere #PoliceRescue #Journey #UnexpectedDetour #TravelStories #BiharToGoa

