बेळगाव : शहापूर येथील बंद झालेला रस्ता पुन्हा — भू-संपादन...

0

 


बेळगाव : शहापूर येथील बंद झालेला रस्ता पुन्हा — भू-संपादन...






बेळगाव—belgavkar—belgaum : शहापूर येथील बँक ऑफ इंडिया ते जुना पी. बी. रोड बंद झाल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता पुन्हा करण्यासाठी महापालिकेने भू-संपादन प्रक्रिया राबवावी. तसेच विधीमंडळ अधिवेशन काळात या रस्त्याची एक बाजू खुली करण्यात यावी, अशी सूचना आमदार अभय पाटील यांनी केली.



महापालिका सभागृहात गुरुवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार पाटील यांनी बँक ऑफ इंडिया ते जुना पी. बी. रोडपर्यंतच्या रस्त्याचा विषय सभागृहात मांडला. महापालिकेचे मोठ्या प्रमाणात पैसे वसूल झालेले नाहीत. त्याकडे महापालिका गांभीर्याने पाहात नाही. याउलट या रस्त्यासाठी पैसे देण्याचा निर्णय घेऊनही रस्ता बंद करण्यात आला. आयुक्तांविरोधात एक तक्रार दिली असती तरी त्यांची बढती झाली नसती. आता रस्ता बंद झाल्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे महापालिकेने या रस्त्यासाठी लवकर भूसंपादन करावे आणि रस्ता कामाला सुरवात करावी. 



तर अधिवेशन काळात रहदारीला अडथळा होऊ नये, यासाठी या रस्त्याची एक बाजू सुरू करावी, असेही आमदार पाटील यांनी सांगितले. आमदार राजू सेट यांनीही याबाबत सरकारला पत्र पाठवण्यात यावे. आपण पाठपुरावा करु, असे सांगितले. तर अधिकाऱ्यांनी या प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.




#Belgaum #Belgavkar #Shahapur #RoadRestoration #LandAcquisition #MunicipalCorporation #TrafficIssues #PublicConcern #AbhayPatil #InfrastructureDevelopment #BankOfIndia #OldPBroad #LocalGovernment #CommunitySupport #RoadSafety #UrbanPlanning #LegislativeSession #PublicTransport #CityDevelopment #LocalIssues



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)