@महाराष्ट्र श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

0

 @महाराष्ट्र श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?








  • संजय शिरसाट यांचं मोठं विधान
  • महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच
  • एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रिपदावर दावा केलेला आहे
  • शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट
  • केंद्रात मंत्रिपद नको, ऑफर नाकारली


महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सध्या खल सुरु आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. असं असतानाच एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. तर भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची ऑफर शिंदेंना दिल्याची माहिती आहे. 


या सगळ्यात जर शिंदे गटाने उपमुख्यमंत्रिपद घेण्याचं मान्य केलं. तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. ते इथे येणार नाहीत. या बातम्या खोट्या आहेत, असं संजय शिरसाट म्हणालेत.



शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजयशिरसाट हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्रिपदासाठी कुठलीही लॉबिंग नाही. मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. सगळ्यांना माहीत आहे राज्यात टायगर जब गुर्राता हैं तो क्या होता हैं? भूचाल आत्ता हैं..... हे भाजपलाही माहीत आहे, त्यामुळे भाजप योग्य निर्णय घेईल. 



भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या बदल्यात केंद्रात महत्त्वाचं मंत्रिपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रिपद देण्याची ऑफर दिली. पण, आता शिंदेंनी या दोन्ही ऑफर्स नाकारत भाजपसमोर गुगली टाकली. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर महायुतीचं संयोजन पद द्यावं, अशी मागणी शिंदेंनी केली आहे.



#Maharashtra #ShivSena #EknathShinde #AjitPawar #DevendraFadnavis #SanjayShirsat #PoliticalDrama #DeputyCM #MaharashtraPolitics #GovernmentFormation #Election2023 #PoliticalNews #ShindeGroup #BJP #PoliticalTensions #LeadershipCrisis #StatePolitics #PoliticalOffers #MaharashtraGovernment #PoliticalSpeculation

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)