28 चेंडूत 100 धावा... IPL मधील Unsold खेळाडूनं मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
- कोण आहे तो अनसोल्ड राहिलेला क्रिकेटर
- भारताकडून सर्वात जलद सेंच्युरी
- Urvil Patel scored a 28-ball hundred vs Tripura
- Patel broke Rishabh Pant’s record for India
- Patel's hundred was also the second fastest in T20s
Urvil Patel breaks costliest player Rishabh Pant's fastest century record
Unsold in IPL auction, Gujarat's Urvil Patel smashes fastest T20 hundred by an Indian
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागली आहे. पण यंदाच्या लिलावात अनेक खेळाडूंना अनसोल्डचा टॅगही लागला. याच यादीत राहिलेल्या अनसोल्ड खेळाडूनं सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत कमालीची फलंदाजी करत खास विक्रम नोंदवला आहे. या खेळाडूनं सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत फक्त २८ चेंडूत शतक झळकावले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो पहिला भारतीय आहे ( right-handed batter scored a 28-ball hundred against Tripura in the Syed Mushtaq Ali Trophy match on Wednesday, November 27 at the Emerald Heights International School Ground in Indore).
या २६ वर्षीय खेळाडूचं नाव उर्विल पटेल असं आहे. तो एक विकेट किपर बॅटर आहे. या खेळाडूनं मेगा लिलावात विक्रमी बोली लागलेल्या रिषभ पंतचा विक्रमही मोडीत काढला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत गुजरात संघाकडून खेळताना त्रिपुरा विरुद्धच्या लढतीत विक्रमी खेळी केली. त्याने अवघ्या २८ चेंडूत शतक साजरे केले. कोणत्याही भारतीयाने टी-२० क्रिकेटमध्ये केलेले हे सर्वात जलद शतक आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टी-२० क्रिकेटमधील सर्वात जलद शतकी रेकॉर्ड
भारतीय वंशाचा एस्टोनिय क्रिकेटर साहिल चौहान याने सायप्रस विरुद्धच्या सामन्यात २७ चेंडूत झळकावले होते शतक (२०२४)
गुजरातकडून खेळताना उर्विल पटेलनं त्रिपूराविरुद्धच्या सामन्यात २८ चेंडूत साजरे केले शतक (२०२४)
ख्रिस गेलनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून खेळताना त्याने पुणे वॉरियर्स विरुद्ध ३० चेंडूत शतक पूर्ण केले होते (२०१३)
रिषभ पंतनं दिल्लीकडून खेळताना हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात ३२ चेंडूत शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले होते. (२०१८)
२०२३ च्या हंगामात उर्विल पटेल हा गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. मिनी लिलावात गुजरातच्या संघाने २० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. पण यंदाच्या लिलावात ३० लाख या मूळ किंमतीसह त्याने नाव नोंदवले होते. पण त्याला कोणत्याही फ्रँचायझी संघाने विकत घेतले नाही.
#UrvilPatel #FastestCentury #T20Cricket #IPL2025 #UnsoldPlayer #RishabhPant #SyedMushtaqAliTrophy #CricketRecords #IndianCricket #GujaratTitans #28BallHundred #CricketHighlights #T20Records #EmeraldHeights #TripuraVsGujarat #CricketAchievement #RightHandedBatter #CricketFans #SportsNews #CricketCommunity #GujaratCricket #IndianBatter #IndoreCricket #CenturyIn28Balls #Sixes #Fours #CricketLovers #IncrediblePerformance
Gujarat’s Urvil Patel smashed the fastest century by an Indian batter in T20 cricket. The right-handed batter scored a 28-ball hundred against Tripura in the Syed Mushtaq Ali Trophy match on Wednesday, November 27 at the Emerald Heights International School Ground in Indore. Rishabh Pant earlier held the record after he smashed a 32-ball hundred for Delhi against Himachal Pradesh back in 2018 at the Arun Jaitley Stadium in Delhi.
Urvil made an unbeaten 113 off 35 balls with seven fours and 12 sixes, helping Gujarat chase down 156 with 58 balls to spare. Patel also smacked the second-fastest hundred in T20s.