बेळगाव : इथून पुढे मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही...

0

 

बेळगाव : इथून पुढे मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही...





शिवसैनिकांनी कर्नाटकाच्या माजी मंत्री व आमदारांना जाब विचारला

महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकातील पोलिसांनी रोखले



बेळगाव—belgavkar—belgaum : सीमाभागात कर्नाटक राज्य सरकारकडून मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्याय आणि दडपशाहीचा जाब विचारण्यासाठी आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी कर्नाटकाच्या माजी मंत्री व आमदारांना रोखले. मराठी सीमाभागातील मराठी भाषिकांवरील दडपशाही व अन्याय बंद न झाल्यास इथून पुढे कर्नाटक राज्याच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला. 





अंबाबाई मंदिर परिसरात बुधवारी झालेल्या या प्रकारामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनामुळे कर्नाटकात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 



कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या सुट्टीमुळे बेळगावातील हिवाळी अधिवेशनाचे काम रद्द करण्यात आले होते. यामुळे अधिवेशनाला आलेल्या मंत्री व आमदारांनी कोल्हापुरात अंबाबाई दर्शनाचे नियोजन केले होते. त्यानुसार कर्नाटकचे माजी मंत्री सुनील कुमार, माजी मंत्री प्रभू चव्हाण यांच्यासह काही आमदार कोल्हापुरात दाखल झाले होते. ही माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते अंबाबाई मंदिर परिसरात एकत्र आले. त्यांनी कर्नाटकच्या माजी मंत्री आणि आमदारांना बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराचा जाब विचारला. तसेच बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास परवानगी दिली नाही व शिवसैनिकांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर रोखले, याचाही निषेध नोंदविला. यावेळी शिवसैनिकांच्या तीव्र भावना पाहून दर्शनासाठी आलेल्या माजी मंत्री आणि आमदारांनी त्यांची समजूत काढत कशीबशी वेळ मारुन नेली. आंदोलनात विजय देवणे, संजय पवार, मंजीत माने, अभिषेक दाभाडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे बेळगाव येथे झालेल्या समितीच्या महामेळाव्यात महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकातील पोलिसांनी रोखले होते. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कर्नाटकातील आमदार, माजी आमदार आले असते त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी झालेला प्रकार सांगून दडपशाही खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला. यावेळी दोन्ही नेत्यांत बोलताना बाचाबाची झाली.



#Belgaum #Maharashtra #Karnataka #ShivSena #UddhavThackeray #Marathi #MarathiLanguage #BorderDispute #JusticeForMarathis #PoliticalProtest #BelgaumProtest #MarathiUnity #KarnatakaPolice #PoliticalTension #AmbabaiTemple #ShivSenaWorkers #MarathiRights #CulturalIdentity #MaharashtraKarnataka #RegionalPolitics

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)