बेळगाव : #अग्निवीर सैन्यभरती मेळावा | Indian Army Agniveer Recruitment
Maratha Light Infantry Regimental Centre (MLIRC)
अग्निवीर जीडी व ट्रेडमन
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर
Indian Army Agniveer Recruitment
बेळगाव—belgavkar—belgaum : राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तसेच आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे युनिट हेडक्वॉर्टर राखीव कोटाअंतर्गत अग्निवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 2 जानेवारीपासून बेळगावच्या शिवाजी स्टेडियमवर भरती मेळावा होणार आहे.
अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर ट्रेडमन, क्लार्क, स्टोअरकिपर व टेक्निकल पदांसाठी भरती होणार आहे. २ जानेवारी रोजी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी अग्निवीर जीडी पदासाठी भरती होईल.
३ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई येथील उमेदवारांसाठी जीडी पदासाठी भरती होईल.
४ रोजी नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी जीडी भरती होणार आहे.
६ रोजी मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक व आंध्रप्रदेश येथील उमेदवारांसाठी जीडी भरती होणार आहे.
७ रोजी अग्निवीर ट्रेडमन पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाईल.
८ रोजी आरक्षित भरती होणार असून ९ रोजी सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
अग्निवीर जीडी व ट्रेडमन पदासाठी १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षांपर्यंत वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी मराठा लाईट इन्फंट्रीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#AgniveerRecruitment #IndianArmy #Belgaum #MarathaLightInfantry #GDI #TradeMan #ArmyJobs #MilitaryCareer #RecruitmentDrive #SportsCandidates #YouthEmpowerment #DefenseJobs #ArmySelection #BelgaumEvents #MaharashtraRecruitment #NationalLevel #ArmyAgniveer #JobOpportunities #CareerInArmy #JoinTheArmy