बेळगाव : दहावीसाठी जादा तास... SSLC Exam
बेळगाव—belgavkar—belgaum : डिसेंबर अखेरपर्यंत दहावीचा अभ्यासक्रम संपवणे आवश्यक आहे. जानेवारी महिन्याच्या आठवड्यापासून दुसऱ्या सराव परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे जादा तासांचे नियोजन सर्व शाळांमधून करण्यात यावे, अशा सूचना शिक्षण खात्याने दिल्या आहेत.
दहावीचा अभ्यासक्रम डिसेंबरअखेर संपवणे हे शिक्षकांसाठी आव्हान असते. यासोबतच सराव परीक्षांना सुरुवात होण्यापूर्वी परीक्षेची तयारी करुन घ्यावी लागते. यातच सहल, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. त्यामुळे अभ्यासक्रम लवकर संपवावा लागतो.
मागील वर्षीपासून वेबकास्टिंग कॅमेरे असल्यामुळे परीक्षा पद्धतीत बदल झाला आहे. गतवर्षी 10 टक्यांनी जिल्ह्याचा निकाल खालावल्याने यावर्षी निकाल वाढीसाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. सकाळी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उठवणे, अधिक तासांचे आयोजन करणे, विषयवार व्याख्यानमाला, उत्तरपत्रिका सोडवून घेणे, पासिंग पॅकेज तयार करणे असे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक गुण घ्यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
प्रत्येक शाळेमध्ये शाळा सुटल्यानंतर ग्रुप स्टडीचे आयोजन करून विषयवार संकल्पनांचे व समस्यांचे निरसन करावे लागत आहे.
दहावी अभ्यासक्रमातील गणित, विज्ञान आणि समाज या विषयांचा अभ्यासक्रम जादा असतो. त्यामुळे डिसेंबरअखेर अभ्यासक्रम संपवण्यात अनेक समस्या येत असतात. यासाठी अधिक तासांचा उपयोग होणार आहे.
#Belgaum #SSLCExam #Education #StudyHard #ExamPreparation #GroupStudy #ExtraHours #StudentLife #AcademicSuccess #LearningJourney #Mathematics #Science #SocialStudies #PracticeTests #Webcasting #SchoolEvents #CulturalPrograms #SportsCompetitions #TeachingChallenges #StudentMotivation