बेळगाव : कधीपासून बेमुदत संप... @कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ

0

 


बेळगाव : कधीपासून बेमुदत संप... @कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ






Govt bus services in Karnataka to be hit as KSRTC staff announce indefinite strike from Dec 31




बेळगाव—belgavkar—belgaum : वेतन, महागाई भत्यामध्ये वाढ करावी यांसह अन्य काही मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी संघटनांच्या संयुक्त समितीने 31 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे निवेदन संयुक्त समितीने मुख्यमंत्री सिध्दरामय्यांना सोमवारी दिले आहे.





परिवहन कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलने करुन सरकारचे लक्ष वेधले. परिवहनमंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बस तिकीट दरवाढ झाल्याशिवाय वेतनवाढ, महागाई भत्तावाढ करणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शांतता मार्गाने आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे ओळखूण परिवहन कर्मचाऱ्यांनी ३१ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. 




मागील वेतन वाढीतील ३८ महिन्यांचे थकीत वेतन त्वरित द्यावे, मूळ वेतनात २५ टक्के वाढ व ३१ टक्के महागाई भत्ता समाविष्ट करून वेतनश्रेणी जाहीर करावा, प्रति महिना 2000 रुपये वैद्यकीय चिकीत्सेसाठी देण्यात यावेत, अशा अनेक मागण्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या आहेत.



Employees of the four Road Transport Corporations (RTCs) in Karnataka have announced an indefinite strike from 6 am on December 31, seeking a pay raise and arrears payments among other things. 

#Belgaum #Karnataka #KSRTC #IndefiniteStrike #TransportWorkers #PayRaise #CostOfLiving #Protest #GovernmentServices #PublicTransport #EmployeeRights #StrikeAction #UnionDemand #TransportMinister #WageIncrease #WorkersSolidarity #KarnatakaTransport #BusServices #LaborRights #StrikeForJustice
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)