@महाराष्ट्र बिहार मॉडेल लागू होणार नाही

0

 @महाराष्ट्र बिहार मॉडेल लागू होणार नाही






  • मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम 
  • बिहारमध्ये लागू केलेले मॉडेल महाराष्ट्रासाठी योग्य नाही.
  • एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी ठेवण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महाराष्ट्रात महायुतीला २३९ जागांचं रेकॉर्डब्रेक बहुमत मिळालं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण? हे निश्चित व्हायचं आहे. आता सर्वांच्या नजरा मुख्यमंत्र्यांच्या निवडीकडे लागल्या आहेत. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी राज्यात राजकीय घाडमोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांना की एकनाथ शिंदे यांना मिळणार यावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू आहेत. दरम्यान, भाजपाच्या प्रवक्त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी बिहार फॉर्म्युल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे संकेत दिले  आहेत. 


मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. पण मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेंस कायम आहे.  भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले की, बिहारमध्ये  नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. महाराष्ट्रात शिवसेनेकडून अशी कोणतीही बांधिलकी करण्यात आली नाही. आम्ही बिहारमध्ये जनता दल सोबत युती केली जेणेकरून भाजप राज्यात प्रवेश करू शकेल, जे झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही हे करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.


प्रेम शुक्ला यांनी माध्यमांना सांगितले की, बिहारमध्ये लागू केलेले मॉडेल महाराष्ट्रासाठी योग्य नाही. महाराष्ट्रात अशी बांधिलकी असण्याचे कारण नाही, कारण आपल्याकडे मजबूत संघटनात्मक पाया आणि नेतृत्व आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी ठेवण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. याउलट, मुख्यमंत्र्यांचा निर्णय निवडणुकीच्या निकालांवर आधारित असेल, असे सर्वोच्च नेतृत्वाने निवडणुकीदरम्यान सांगितले होते. 


माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे निवडणूक समन्वयक रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांचा दावा फेटाळून लावला.  दानवे म्हणाले, मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांनी आधीच त्यांच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची नियुक्ती केली आहे आणि भाजप लवकरच नेता निवडणार आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही निकालानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक मुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.


#Maharashtra #Bihar #ElectionResults #ChiefMinister #EknathShinde #DevendraFadnavis #PoliticalDrama #Mahayuti #AssemblyElections #Leadership #BJP #ShivSena #PoliticalSuspense #ElectionStrategy #CoalitionPolitics #StatePolitics #PoliticalNews #Election2023 #GovernmentFormation #PoliticalLeadership

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)