@महाराष्ट्र भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी रस्ता मोकळा करावा

0

 

@महाराष्ट्र भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी रस्ता मोकळा करावा





BJP firm on Devendra Fadnavis, Eknath Shinde may have to swallow bitter pill


  • मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा
  • महायुतीत जनतेचा कौल सर्वाधिक भाजपाला
  • जनतेने सगळ्यात जास्त जागा भाजपाला दिल्यात
  • #Maharashtra #Mahayuti #Politics #MaharashtraPolitics



देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर पक्षांच्या साथीनं महायुती झाली आणि या महायुतीनं महाराष्ट्राच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली. मतदारांनी महायुतीच्या पारड्यात मतं दिली असतानाच आता निकालानंतर राज्यात नवी सत्ता केव्हा स्थापन होणार आणि मुख्य म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याचीच उत्सुकता सामान्यांसह राजकीय वर्तुळातही पाहायला मिळत आहे. 


महायुतीत जनतेचा कौल सर्वाधिक भाजपाला आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत. मागील वेळी जनतेनं आम्हाला मोठा भाऊ म्हणून कौल दिला होता तरीही आम्ही लहान भावाला सिंहासनावर बसवलं आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने प्रगती केली आहे. त्यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांनी काम केले आहे. मागच्यावेळी आम्ही त्यांना सिंहासनावर बसवलं आता त्यांनी मनाचं औदार्य दाखवावं आणि भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी रस्ता मोकळा करावा असं विधान भाजपा खासदार अजित गोपछडे यांनी केलं आहे.




दिल्लीत पत्रकार परिषद घेत अजित गोपछडे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे जनतेतला माणूस आहे. रिक्षा चालवणारा व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री होते. ते कधीही आडमुठेपणा करत नाहीत. मी कधीही त्यांना भेटलो, माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न तातडीने सोडवतात. माझ्या मनात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. ते निश्चित देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मोठ्या मनाने स्वीकार करतील. विरोधकांना एवढी मोठी चपराक बसलीय, त्यांनी आत्मचिंतन करावे. विरोधकांना जनतेने स्थान दाखवलं आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतीत न बोलता झालेल्या पराभवाचे चिंतन करावे. जनतेचा कौल मान्य करावा असं त्यांनी म्हटलं.


राज्यात अतिशय चांगले वातावरण आहे. जनतेने आम्हाला कौल दिला आहे. जनतेच्या मनातील सरकार आलेले आहे. जनतेने सगळ्यात जास्त जागा भाजपाला दिल्यात. आमचा स्ट्राईक रेट ९९ टक्के आहे. त्यामुळे ज्याचा स्ट्राईक रेट मोठा त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही आग्रही आहोत. अनेकजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. 


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्याची प्रगती झाली. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात राज्याला पुढे नेले. अभ्यासू, संयमी आणि लोककल्याणकारी योजना राबवणारे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्राला लाभावे असंही भाजपा खासदार अजित गोपछडे यांनी सांगितले.


#Maharashtra #Mahayuti #Politics #Unity #MaharashtraPolitics #Election2023 #PoliticalAlliance #MaharashtraNews #SocialChange #Community #Leadership #Empowerment #CivicEngagement #VoteForChange #MaharashtraDevelopment #TogetherForMaharashtra #Progress #MaharashtraCulture #Inspiration #FutureOfMaharashtra


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)