फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा... Cyclone Fengal

0

 

फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा... Cyclone Fengal





  • कोणत्या राज्यांना रेड अलर्ट? 
  • बंगालच्या उपसागरात Cyclone Fengal
  • भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज
  • Cyclone Fengal: Which country named it


Cyclone Fengal : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. या चक्रीवादळाला फेंगल नाव देण्यात आले असून, भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या चक्रीवादळाचा अनेक राज्यांना तडाखा बसण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही राज्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.


Cyclone Fengal expected to make landfall on Nov 29


हे चक्रीवादळ लवकरच किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ पासून ते पंजाबपर्यंत हवामानात बदल होणार आहे. चक्रीवादळामुळे अनेक राज्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ नोव्हेंबर रोजी चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यानंतर वादळाची तीव्रता वाढणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस हे चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून तामिळनाडूची किनारपट्टी आणि  उत्तर पश्चिम दिशेने कूच करेल. त्यामुळे किनारपट्टी भागातील राज्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  


कोणत्या राज्यांना रेड अलर्ट : हवामान विभागाने फेंगल चक्रीवादळामुळे हवामानात बदल होणार असल्याचे म्हटले आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरी मध्ये २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.  केरळमध्ये २७ नोव्हेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, रायलसीमा भागात २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा भागात २८ नोव्हेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर इंडिगोकडून चेन्नई, तुतीकोरिन आणि मदुरै येथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानसेवांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रतिकूल हवामानामुळे चेन्नई, तुतीकोरिन आणि मदुरै या ठिकाणच्या सेवांवर परिणाम झाला आहे.  



A cyclonic storm named Cyclone Fengal is likely to make landfall along Tamil Nadu's northeastern coast on November 29

बंगालच्या उपसागरावरील खोल दाब चक्रीवादळ फेंगलमध्ये तीव्र होणार आहे, ज्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये जोरदार पाऊस आणि जोरदार वारे वाहतील. अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद आहेत, तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी खडबडीत समुद्र आणि पुराच्या धोक्यांदरम्यान सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सज्जता उपाययोजना सुरू केल्या आहेत. 6 जिल्ह्यांतील शाळा बंद, तर 9 जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद. चेन्नई, कांचीपुरम, चेंगलपेट, अरियालूर, शिवगंगाई आणि पुदुकोट्टई येथे शाळा बंद. विल्लुपुरम, तिरुवल्लूर, कुड्डालोर, तंजावर, तिरुवरूर, नागापट्टिनम, मायिलादुथुराई, रामनाथपुरम आणि त्रिची येथे दोन्ही शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत.


Cyclone Fengal, intensifying in the Bay of Bengal, threatens Tamil Nadu, prompting high alert. 


A deep depression over the Bay of Bengal is set to intensify into Cyclone Fengal, bringing heavy rain and strong winds to Tamil Nadu, Puducherry, and Andhra Pradesh. Schools are shut in several districts, while Tamil Nadu CM MK Stalin has initiated preparedness measures to ensure public safety amid rough seas and flooding risks. Schools closed in 6 districts and both, schools and colleges closed in 9 districts. Schools closed in Chennai, Kanchipuram, Chengalpet, Ariyalur, Sivagangai and Pudukottai. Both schools and colleges are closed in Villupuram, Tiruvallur, Cuddalore, Thanjavur, Tiruvarur, Nagapattinam, Mayiladuthurai, Ramanathapuram and Trichy.



#CycloneFengal #FengalCyclone #WeatherAlert #RedAlert #TamilNadu #AndhraPradesh #Kerala #HeavyRain #CycloneWarning #IndiaWeather #BengalBay #StormTracking #DisasterPreparedness #FloodAlert #EmergencyServices #CoastalSafety #RainfallForecast #WeatherUpdates #NaturalDisaster #StaySafe
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)