IPL लिलावाच्या वेळी फिक्सिंगचा खेळ?
CSK exposed.... Accused in fixing by IPL owner right after Mega Auction
‘Indirect Fixing?’ Modi Hits CSK Owner with Spot-Fixing Accusation
- CSK accused of rigging IPL auction!
- मोदींचा गंभीर आरोप - Former Indian Premier League (IPL) chairman Lalit Modi
- चेन्नई सुपर किंग्ससंदर्भात मोठा गौप्यस्फोट
- CSK च्या सामन्यासाठी निवडले जायचे चेन्नईचे अंपायर्स
- २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर RR संघासह CSK च्या संघावरही बंदीची कारवाई
- Lalit Modi’s comments on N Srinivasan go viral
आयपीएलच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ४६७ कोटी रुपये खर्च करण्यात आले ते फक्त ७२ खेळाडूंवर. एका बाजूला आयपीएल २०२५ मेगा लिलावाची चर्चा सुरु असताना इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी चेन्नई सुपर किंग्ससंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. चेन्नई सुपर किंग्सचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि सचिव एन. श्रीनिवासन (Former BCCI secretary N Srinivasan) अंपायर्संना फिक्स करायचे, असा गंभीर आरोप ललित मोदींनी केलाय.
आयपीएलच्या मेगा लिलावानंतर ललित मोदींनी स्फोटक मुलाखतीनं लक्षवेधून घेतले आहे. लिलावावेळीही एन श्रीनिवासन फिक्सिंग करताना पाहिले आहे. त्याच्यासोबत शत्रूत्व निर्माण झाले, असा दावाही त्यांनी केलाय.
ललित मोदी म्हणाले की, २००९ च्या लिलावात इंग्लंडच्या अँड्रू फ्लिटॉफला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी श्रीलंकन टीशारा परेराला Chennai Super Kings (CSK) च्या यादीतून बाहेर करण्यास सांगितले होते. या लिलावात अँड्रू फ्लिंटॉफसाठी चेन्नई सुपर किंग्सनं ७ कोटी ५० लाख रुपये मोजून आपल्या संघात घेतले होते. श्रीनिवासन यांच्या सांगण्यावरून अन्य फ्रँचायझींनी त्याच्यावर अधिक बोली लावू नये, अशी सुचना आपण दिली होती, असे ललित मोदींनी म्हटले आहे.
आयपीएलच्या नियोजनासंदर्भातील गप्पा गोष्टी करताना ललित मोदी पुढे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात श्रीनिवासन यांना आयपीएलच्या यशाबद्दल संभ्रम होता. श्रीनिवासन चेन्नई सुपर किंग्सच्या बाजून निर्णय देण्यासाठी अंपार्यसोबतही सेटिंग करायचे. आपण याला अप्रत्यक्षरित्या फिक्सिंग म्हणतो, असा खळबळजक दावाही त्यांनी केला. आमच्यात दुश्मनी निर्माण झाल्यावर ते जी गोष्ट करत होते तोच आरोप माझ्यावर करण्यात आला.
आयपीएलमधील CSK च्या सामन्यासाठी चेन्नईचे अंपायर्स निवडले जायचे. सुरुवातीच्या काळात मी यावर फार विचार केला नाही. पण ज्यावेळी गोष्ट लक्षात आली त्यावेळी हा प्रकार अप्रत्यक्षरित्या फिक्सिंगचा आहे, असे म्हणत मी त्यांना विरोध केला होता. तेव्हापासून ते माझे विरोधक झाले, असा दावाही ललित मोदी यांनी केला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यांनी पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर राजस्थान रॉयल्स संघासह चेन्नई सुपर किंग्सच्या संघावरही बंदीची कारवाई झाली होती.
#IPL #CSK #Fixing #Auction #LalitModi #NShreenivasan #SpotFixing #CricketScandal #IndianPremierLeague #ChennaiSuperKings #IPL2025 #CricketCorruption #MegaAuction #CricketNews #SportsIntegrity #BCCI #CricketFans #MatchFixing #CricketCommunity #IPLAccusations
Former Indian Premier League (IPL) chairman Lalit Modi has accused Former BCCI secretary N Srinivasan of using Chennai umpires for Chennai Super Kings (CSK) games in the T20 league. He alleged that the former ICC chairman didn’t like the concept of IPL and went against him when he tried to expose the umpiring fiasco.