बेळगाव : शिकाऊ परवाना असला तरी विमा भरपाई @कर्नाटक

0

बेळगाव : शिकाऊ परवाना असला तरी विमा भरपाई @कर्नाटक





  • Learner licence (LL)
  • Driving Licence (DL)


Learner's with valid licence are covered by motor insurance 




बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : वाहन चालकाकडे शिकाऊ वाहनचालन परवाना (एलएल) असला तरी अपघात विमा भरपाईसाठी संबधित चालक पात्र असल्याचा निर्णय जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.


बसव राजू यांचा एप्रिल २०२२ मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. बसव यांचे वडील भीमाप्पा यांनी श्रीराम जनरल या विमा कंपनीकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज केला होता. मात्र, चालकाकडे कायमस्वरुपी वाहन परवाना (डीएल) नसल्याचे सांगत मयत चालकाला भरपाई देता येणार नाही असे सांगून अर्ज नाकारला होता. याविरोधात भीमप्पा यांनी ग्राहक वाद निवारण आयोगाकडे दाद मागितली होती.


चौकशी करुन आयोगाने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ देत, शिकाऊ परवाना असला तरी असा चालक भरपाईसाठी पात्र ठरतो, असा निर्वाळा दिला. अर्जदाराला वैयक्तिक अपघाताच्या रकमेसाठी १५ लाख रुपये विमा कंपनीने अर्ज नाकारल्यापासून ४५ दिवसांच्या आत वार्षिक ९ टक्के व्याजासह भरपाई द्यावी, असा आदेश दिला. तसेच आदेशाच्या तारखेपासून पूर्ण रक्कम देईपर्यंत १५ लाखांवर वार्षिक १२ टक्के व्याज दिले पाहिजे, असा आदेश आयोगाचे अध्यक्ष टी. शिवन्ना यांनी दिला. 



अर्जदाराला कंपनीच्या सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये आणि कायदेशीर बार्बीसाठी आलेला खर्च म्हणून १० हजार रुपये देण्याचाही आदेश दिला.


#Belgaum #LearnerLicence #DrivingLicence #MotorInsurance #AccidentCompensation #Karnataka #InsuranceClaim #LegalRights #ConsumerProtection #RoadSafety #InsurancePolicy #TrafficRules #AccidentVictim #JusticeServed #InsuranceCoverage #DrivingSafety #ClaimSettlement #LegalAwareness #ConsumerRights #FinancialCompensation

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)