PM मोदींना फोन केला, सांगितलं कुठलाही अडसर नसेल

0


PM मोदींना फोन केला, सांगितलं कुठलाही अडसर नसेल


CM : Eknath Shinde


‘I am not a hurdle’: Eknath Shinde clears way for BJP CM in Maharashtra, says will support top brass’s decision


एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

  • “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...” एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'

 

Whatever decision BJP takes over Maharashtra CM position, Shiv Sena has their full support, says Eknath Shinde


Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोणाचा असेल यावरुन चर्चा रंगली. भाजपाचा मुख्यमंत्री होणार या चर्चेने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत का, अशी कुजबूज सुरु होती. अखेर या चर्चांवर शिंदे यांच्या पत्रकार परिषदेने पडदा पडला.यावेळी अनेक बाबींवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत काय बोलणे झाले, याबाबत माहिती देताना मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे भाष्य केले.

मी कार्यकर्ता म्हणून काम केले. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केले. नाराज होऊन आम्ही रडणारे नाही. तर जनतेसाठी काम करणारे आहोत. रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करेन. महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाइड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही. जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केले, लोकांनी जो विश्वास दाखवला. हा विजय झाला. हा जनतेचा विजय आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याचे सांगताच, एकनाथ शिंदे यांचा पुढचा प्लॅन काय? असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले “जीवन में असली उड़ान अभी बाकी है,

 

अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन,

अभी तो सारा आसमान बाकी है…

 

आपण खूप काम केले आहे. आम्ही केलेलं काम तुमच्या समोर आहे. यापुढे महायुती म्हणून काम करायचं आहे. आम्हाला मिळालेले बहुमत जितके मोठे आहे तितकेच आमची जबाबदारीही वाढली आहे. यापुढे महायुती आणखी काम करत राहणार आहोत,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपला ‘फ्युचर प्लॅन’ सांगितला.

बाळासाहेब ठाकरे यांची सर्वसामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा होती, ती इच्छा पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो घेतील तो शिवसेना म्हणून आम्हाला मान्य असेल. मोदी आणि अमित शाह यांना फोन केला होता. त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय होईल, त्यामध्ये माझा कोणताही अडसर नसेल. भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे. गेली अडीच वर्ष भाजपाने पाठिंबा दिला. त्यामुळे आता आम्ही भाजपा जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असेल. 

 

Tag : #MaharashtraElections #ShivSena #EknathShinde #Modi #AmitShah #FuturePlans #PoliticalVictory #CommonMan #Leadership #LandslideVictory #Mahayuti #PublicService #Election2024 #PoliticalDialogue #GrassrootsWork #MaharashtraPolitics #ShivSenaLeader #VoterTrust #PoliticalStrategy #CommunityEngagement

 

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)