बेळगाव-कोल्लम मार्गावर विशेष रेल्वे #शबरीमला

0

 


बेळगाव-कोल्लम मार्गावर विशेष रेल्वे #शबरीमला


Belgaum–Kollam Sabarimala special train on every Monday




Southern Railway announces extension and addition of special trains for Sabarimala pilgrims


SWR to run special trains for Sabarimala pilgrims



बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगावमधील अनेक अय्यप्पा भक्त शबरीमला येथील मंदिराला यात्रोत्सवानिमित्त भेट देत असतात. या निमित्ताने नैर्ऋत्य रेल्वेने बेळगाव-कोल्लम व हुबळी-कोल्लम या मार्गावर विशेष रेल्वे सुरु केल्या आहेत. 





बेळगाव-कोल्लम या रेल्वेच्या ९ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान एकूण सहा फेऱ्या होणार आहेत.


०७३१७ ही एक्स्प्रेस बेळगावमधून प्रत्येक सोमवारी निघणार आहे. दुपारी २.३० वा. ही रेल्वे बेळगावमधून निघणार असून दुसऱ्या दिवशी सायं. ४.३० वा. कोल्लम येथे पोहोचेल. ही एक्स्प्रेस खानापूर, लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, राणेबेन्नूर या मार्गाने धावणार आहे. 



Train no. 07317 Belgaum-Kollam Special Express will depart from Belgaum every Monday from December 9 to January 13 at 2.30 p.m.

या एक्स्प्रेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन नैऋत्य रेल्वेने केले आहे.


The Sabarimala Sree Dharma Sastha Temple is a Hindu temple dedicated to the god Ayyappan, who is also known as Dharma Shasta and is the son of the deities Shiva and Mohini (female avatar of the god Vishnu).


The temple is situated atop the Sabarimala hill in the village of Ranni-Perunad, within the Ranni Taluk of the Pathanamthitta district in the state of Kerala, India. The temple is surrounded by 18 hills in the Periyar Tiger Reserve. 



It is one of the largest annual pilgrimage sites in the world, with an estimate of over 10 to 15 million devotees visiting every year.


सबरीमाला तीर्थयात्रा. ... शबरीमलाई, ज्याला सबरीमाला म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील सर्वात आदरणीय तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, जे दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करते


Sabarimala | Pathanamthitta District, Government of Kerala | India


#Sabarimala #BelgaumKollam #SpecialTrain #AyyappaDevotees #SouthernRailway #Pilgrimage #TrainJourney #SabarimalaPilgrims #DevotionalTravel #IndianRailways #SabarimalaTemple #Belgaum #Kollam #Ayyappa #RailwayAnnouncement #FestiveTravel #SpiritualJourney #HinduPilgrimage #TrainToSabarimala #SabarimalaYatra


विष्णू आणि शिव यांच्या एकत्र शक्तीने भगवान अयप्पा यांची निर्मिती झाली. अयप्पा ही देवता शाश्वत ब्रह्मचारी असल्याने मागील 1500 वर्षांपासून या मंदिरात मासिकपाळीच्या टप्प्यातील महिलेला प्रवेश नाकारला जात होता.


पुराणातील कथेनुसार, शबरीमला मंदिर ही ती जागा आहे जेथे अयप्पांनी महिशी या असुराचा वध केला होता. महिशी ही महिशासुराची बहीण होती. दुर्गा देवीने महिशासुराचा वध केल्यानंतर बदला घेण्यासाठी महिशी आणि अयप्पा यांच्यामध्ये युद्ध रंगलं. मात्र यामध्ये महिशीचा वध झाला.


शबरीमला मंदिराचं नाव रामायणातील शबरीच्या नावावरून पडलं. शबरीचं वास्तव्य डोंगरांच्या ज्या भागामध्ये होतं तेथेच हे मंदिर असल्याने या मंदिराचं नामकरण 'शबरीमला' असं करण्यात आलं आहे.


शबरीमला मंदिर हे 18 पर्वतांमध्ये आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठीदेखील केवळ 18 चं पायर्‍या आहेत. पहिल्या पाच पायर्‍या आपल्या पाच ज्ञानेंद्रियांचं प्रतिक आहे. त्यापुढील आठ पायर्‍या अपल्यातील आठ वाईट दोषांचं प्रतिक आहे ज्यामध्ये राग आणि वासना यांचाही समावेश होतो. पुढील दोन आपले जन्मजात गुण आणि शेवटचे दोन ज्ञान आणि अज्ञानाचं प्रतिक आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)