मंत्र्याचा Video व्हायरल... अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरुनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह..…’

0


मंत्र्याचा Video व्हायरल... अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरुनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह..…’  









  • एका भाजपच्या मंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल
  • Gautam Tetwal stopped his speech during Azaan



सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक हैं तो सेफ हैं’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बंटेंगे तो कटेंगे’ घोषणांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच मध्य प्रदेश सरकारमधील एका भाजपच्या मंत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अजान ऐकून भाषण थांबवणारे मंत्री हे मंचावरूनच ‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह…’ म्हणताना दिसत आहेत. यावरून पुन्हा राजकीय चर्चांना वेग आला आहे.


मध्य प्रदेशमधील डॉ. मोहन यादव सरकारमधील गौतम टेटवाल हे मंत्री आहेत (Minister of State (Independent Charge) for Skill Development and Employment). राजगढ जिल्ह्यातील मऊ गावात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गौतम आले होते. गौतम हे भाषण करत असताना अजान सुरु झाली. अजान सुरू झाल्याचे ऐकताच गौतम यांनी भाषण थांबवले. 


ज्या वेळी हा कार्यक्रम होत होता, त्यावेळेस सव्वा सात वाजले होते आणि ईशाची नमाज होत होती. अजान संपल्यानंतर मंत्री गौतम यांनी संस्कृतमधील एक श्लोक म्हटला.  ते म्हणाले, “वह कहता है कि उससे डरो, नेक काम करो। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।”. यानंतर त्यांनी मंचावरुनच ‘ला इलाहा इल्लल्लाह…’, असेही पठण केले. गौतम टेटवाल यांचा यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल सध्या होत आहे. यावरुन काहींनी त्यांच्यावर निशाणा साधला असून हिंदू समाजाची माफी मागावी, असे म्हटले आहे.


ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह ۔ (ع) مذکر۔ کلمۂ طیّب خدا کے سوا کوئی پرستش کے قابل نہیں اور محمّد (صلعم) اُس کے بھیجے ہوئے رسول ہیں



#GautamTetwal #Azaan #ViralVideo #PoliticalDebate #SkillDevelopment #MadhyaPradesh #BJPMinister #UnityInDiversity #CulturalRespect #ReligiousHarmony #SpeechInterrupted #SocialMediaBuzz #PublicSpeech #CommunityEngagement #InterfaithDialogue #MinisterOfState #CivicResponsibility #CulturalAwareness #RespectForAll


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)