बेळगाव : टिळकवाडी क्लबची जागा ताब्यात घ्या — आमदार अभय पाटील...

0

 


बेळगाव : टिळकवाडी क्लबची जागा ताब्यात घ्या — आमदार अभय पाटील...





टिळकवाडी क्लबकडे कोटी रुपये थकीत...



बेळगाव—belgavkar—belgaum : महापालिका सभागृहात गुरुवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. टिळकवाडी क्लबचे लीज संपले आहे. त्यांच्याकडे महापालिकेची ₹ 2 कोटी 68 लाख रुपयांची घरपट्टी थकीत आहे. क्लबकडे 1 एकर 13 गुंठे इतकी महापालिकेची जागा आहे. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी काय केले, असे नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी बैठकीत विचारले. 




त्यावर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे, त्यामुळे यावर चर्चा करता येत नाही, असे अधिकारी रेश्मा तालिकोटी यांनी सांगितले. पण आमदार अभय पाटील यांनी या प्रकरणात मनाई आदेश नसताना चर्चा करण्यास हरकत नाही, असे सांगितले. 2016 मध्ये लीज संपले असले असल्यामुळे ती जागा ताब्यात घेऊन नव्याने निविदा काढा, असे सांगण्यात आले.


#Belgaum #Belgavkar #TilakwadiClub #MunicipalCorporation #AbhayPatil #LeaseIssue #CourtCase #PropertyTax #LandDispute #LocalPolitics #CommunityMeeting #RealEstate #PublicDiscussion #UrbanDevelopment #CityCouncil #LegalMatters #LandLease #GovernmentAction #FinancialRecovery #LocalGovernance

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)