बेळगाव : आंबेवाडी ग्रामपंचायत सदस्यांचा सामूहिक राजीनामा
बेळगाव—belgavkar—belgaum : आंबेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, अध्यक्षा, उपाध्यक्ष या सर्वांच्या वतीने सामूहिक राजीनामा पंचायत विकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. आंबेवाडी ग्रामपंचायत सेक्रेटरी यांच्या मनमानी कारभारामुळे तसेच भ्रष्टाचार होत असल्याने या सर्वाला कंटाळून सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत विकास अधिकारी यांच्याकडे सामूहिक राजीनामा सादर केला.
याचा स्वीकार पंचायत विकास अधिकारी यांनी केला आहे. सातत्याने गावातील विकासासंदर्भात, जनतेच्या कामासंदर्भात दिरंगाई होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय या ग्रामपंचायतला अद्याप कायमस्वरुपी पंचायत विकास अधिकाऱ्यांची नेमणूक नसून अवघ्या दोन वर्षात आठ पंचायत विकास अधिकाऱ्यांनी कार्य केले आहे. त्यामुळे या कार्यक्षेत्रातील कोणताही निर्णय योग्यरीत्या हाताळलेला नाही. या सर्वाला कंटाळून अशाप्रकारचा निर्णय घेऊन राजीनामा सादर केला.
सदर राजीनामापत्रावर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी यळगुकर, उपाध्यक्ष शंकर सुतार, सदस्य चेतन पाटील, सुभाष नाईक, अर्जुन राक्षे, नारायण लोहार, यल्लाप्पा लोहार, रामा नाईक, ज्योतिबा शहापूरकर, मधु चौगुले, नागेश चौगुले, विष्णू कांबळे, दत्तोबा चौगुले, सदस्या आरती न्हावी, सुधा ढोपे, सुवर्णा लोहार, संगीता आंबेकर, जयश्री तोरे, सरिता नाईक, ललिता पाटील, लक्ष्मी सांबरेकर, लता कडोलकर यांच्या सह्या आहेत.
Collective resignation of Belgaum Ambewadi Gram Panchayat members
#Belgaum #Belgavkar #Ambewadi #GramPanchayat #Resignation #Corruption #Development #LocalGovernment #CommunityAction #PanchayatRaj #Leadership #PublicService #Accountability #VillageDevelopment #CivicEngagement #Transparency #Governance #SocialChange #CollectiveAction #Empowerment
Collective-resignation-of-Belgaum-Ambewadi-Gram-Panchayat-members