बेळगाव : मेळाव्याला परवानगी देवू नका...

0

 


बेळगाव : मेळाव्याला परवानगी देवू नका...





  • बेळगावात हिवाळी अधिवेशन
  • समितीच्यावतीने महामेळावा


बेळगाव—belgavkar—belgaum : कर्नाटक सरकारच्या वतीने बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्यात येणार असून याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी करत काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसरात गोंधळ घातला.




गेल्या काही वर्षापासून कर्नाटक सरकारच्यावतीने हलगा येथील सुवर्णसौधमध्ये हिवाळी अधिवेशन घेण्यात येते. याला विरोध करत येथील महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही होणाऱ्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी म. ए. समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. याचा पोटशूळ असलेल्या काही कन्नड संघटनांतर्फे आगपाखड करण्यात येत आहे. 



सदर महामेळाव्याला परवानगी दिली जाऊ नये, यासाठी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात धिंगाणा घातला. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना गेटवरच अडवून कार्यालयाच्या आवारात प्रवेश नाकारला. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ वादावादी झाली.




#Belgaum #Karnataka #Maharashtra #Protest #WinterSession #Unity #Kannada #MaharashtraEkikaran #Rally #Demonstration #PoliticalGathering #Government #PublicProtest #CivilRights #SocialJustice #CommunityAction #Activism #LocalIssues #BelgaumProtest #KarnatakaPolitics

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)