बेळगाव : बोगस लेबरकार्ड... किती हजार कार्डे रद्द

0



बेळगाव : बोगस लेबरकार्ड... किती हजार  कार्डे रद्द






Over 1700 Fake Labour Cards Scrapped in Belgaum District


Labour Department says more fake beneficiaries than genuine workers in Karnataka



Govt cracks down on misuse of labour cards : बेळगाव-belgavkar : विविध कामगार संघटना आणि व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आवज  उठवल्यानंतर कामगार विभागाने बोगस कामगार कार्ड काढून टाकण्यासाठी लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. खऱ्या कामगारांपेक्षा बोगस कार्डधारकांची संख्या अधिक असल्याचा संशय आहे. विभागाने राज्यभर एक महिनाभर मोहीम राबविली. कर्नाटक राज्य सरकारने बोगस बीपीएल कार्डे रद्द करण्याचा सपाटा चालविलेला असताना आता कामगार खात्याने बोगस लेबरकार्ड शोधून ती रद्द करण्याची मोहीम हाती घेतली आहे. 



एका बेळगाव जिल्ह्यात 1778 बोगस लेबरकार्डे आढळून आली असून खात्याने ती रद्दबातल केली आहेत. बांधकाम कामगारांच्या नावे कार्ड बनवून घेऊन कर्नाटक बांधकाम-इतर निर्मिती कामगार कल्याण मंडळाच्या सुविधांचा लाभ घेत असलेल्या बोगस कामगारांवर ही कारवाई झाली आहे. मंडळामार्फत कामगार व त्यांच्या मुलांना मिळणाऱ्या सुविधांचा बोगस कामगार लाभ उठवत असल्याचे कामगार खात्याच्या निदर्शनास आल्यानंतर लेबरकार्ड तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे मूळ कामगारांना न्याय मिळाला असल्याचे सिद्ध झाले आहे. 


बेळगाव जिल्ह्यात बोगस लेबरकार्डांचा सुळसुळाट सुरु असल्याच्या तक्रारी कामगार खात्याकडे आल्या होत्या. यासाठी मागील वर्षीही बोगस लेबरकार्डे शोधून ती रद्दबातल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. आता बेळगाव कामगार अधिकारी उपविभाग-1 मध्ये नोंदणी असलेल्या 18 हजार 442 लेबरकार्डे व उपविभाग-2 मध्ये नोंद असलेल्या 1 लाख 26 हजार 778 लेबरकार्ड अशा एकूण 1 लाख 45 हजार 220 लेबरकार्डांची तपासणी केली. यामध्ये 1778 लेबरकार्डे बोगस असल्याचे आढळून आले. 


इमारत बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी कर्नाटक बांधकाम व इतर निर्मिती कामगार कल्याण मंडळ कार्यरत असून कामगारांना विविध सुविधा देत आले आहे. शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत, बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदत, लॅपटॉप वितरण, विवाह कार्यासाठी मदत, कामावर असताना अपघात घडल्यास जखमी झालेल्या कामगाराला आर्थिक मदत, बांधकाम कामावर असताना अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाल्यास संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा देण्यात मंडळ कार्यरत आहे. 



बांधकाम कामगार लेबरकार्डवरून कामगार खात्याच्या सुविधा मिळू शकतात. यापूर्वी सेवासिंधू पोर्टलवर बांधकाम कामगारांनी नाव नोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक होते. तर आता कामगार खात्यामध्येच नवी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारेच कामगारांची नावनोंदणी करण्यात येते. तरीही कामगार खात्याला खोटी माहिती देऊन अर्ज सादर केल्यास सॉफ्टवेअरमार्फत तशांचा शोध घेऊन अर्ज रोखण्यात येतो. त्यामुळे बोगस कार्डांचा शोध घेण्यासाठी कामगार खात्याकडे दोन पर्याय आहेत. एकीकडे कामगारांनी लेबरकार्ड मिळविण्यासाठी नव्याने अर्ज केल्यानंतर व लेबरकार्डाच्या नूतनीकरणासाठी नोंदणी करताना कामगार खात्याकडून शहानिशा होत असते. प्रतिवर्षी लेबरकार्डचे नूतनीकरण करणे कामगारांना सक्तीचे आहे. वर्षभरात किमान 90 दिवस बांधकाम कामात व्यस्त असल्यासच संबंधित कामगारांना लेबरकार्डचे नूतनीकरण करण्यात येते, अशी माहिती कामगार खात्याकडून उपलब्ध झाली आहे.


The labour cards are issued by the Karnataka Building and Other Construction Workers’ Welfare Board only to construction workers and those working with allied industries. A 1 per cent cess is levied on all construction projects, including residential, commercial and government, and the money is used only for the welfare of construction workers. Rs 800 crore to Rs 1,000 crore is collected every year.



The Labour Department has started screening documents of beneficiaries to eliminate bogus labour cards after various trade unions and individuals have raised a stink about a large-scale fraud. It is suspected that the number of bogus card holders is more than genuine workers. The department launched a month-long drive across the state.

#Belgaum #FakeLabourCards #LabourDepartment #Karnataka #LabourRights #WorkerWelfare #FraudPrevention #GovernmentAction #SocialJustice #ConstructionWorkers #LabourCardVerification #EmploymentFraud #KarnatakaGovernment #WorkerSupport #BelgaumDistrict #LabourReforms #CardScrapping #GenuineWorkers #LabourUnion #FakeBeneficiaries

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)