बेळगावसह काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता । Cyclone Fengal

0



बेळगावसह काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता ।  Cyclone Fengal







Cyclone Fengal: Orange alert for Bengaluru, nearby districts until December 3


IMD issues red alert for several districts in Kerala



बेळगाव-belgavkar : Cyclone Fengal that made landfall in the coasts of Puducherry and Tamil Nadu  : गेल्या काही दिवसांपासून हाडे गोठवणारी थंडी आज अचानक बेपत्ता झाली आहे. याचबरोबर पुढील दोन तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम असून यामुळे काजू, आंबा मोहोराला फटका बसणार आहे.


Bengaluru and other parts of South Interior Karnataka are on high alert - India Meteorological Department (IMD)


बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच फेंगल चक्रीवादळामुळे बंगळूरसह बेळगाव, धारवाड, कोलार, चामराजनगरासह एकूण 9 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. 3 डिसेंबरपर्यंत दक्षिणेतील काही जिल्ह्यांसह इतर ठिकाणी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ सी. एस. पाटील यांनी वर्तवला आहे.



गेल्या ५ दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तेथील कमाल तापमानात घट झाली आहे. उडुपी, मंगळूर, शिमोगा, हासन, कोडगू, म्हैसूर, मंड्या, चामराजनगर आणि कोलार या नऊ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या जिल्ह्यांना 2 व 3 रोजी यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. बेळगाव, धारवाड, गदग, हावेरी, बिदर, गुलबर्ग्यासह दक्षिणेतील काही जिल्ह्यांमध्ये मंगळवारी जोरदार पावसाची शक्यता आहे.



३ व ४ डिसेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तस इतर ठिकाणी मध्यम, हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ३ तारखेला कोल्हापूर, सिंधुदूर्ग तर ४ तारखेला या दोन जिल्ह्यांसह सातारा, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांनाही अलर्ट दिलायं



फेंगल चक्रीवादळाचा दक्षिणेतील जिल्ह्यांवर अधिक परिणाम होणार आहे. तर उत्तरेतील जिल्ह्यांमध्ये किरकोळ सरी कोसळतील, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. 



The IMD on Monday (December 2, 2024) said that the depression (remnant of cyclonic storm “FENGAL”) over north coastal Tamil Nadu & Puducherry


#CycloneFengal #BengaluruWeather #RainAlert #IMD #WeatherUpdate #SouthKarnataka #Belgaum #HeavyRain #OrangeAlert #KeralaWeather #Puducherry #TamilNadu #WeatherForecast #Monsoon #RainySeason #ClimateChange #WeatherWarning #Karnataka #StormAlert #Meteorology


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)