भाजपाने एकनाथ शिंदे यांना काय दिला मेसेज? Maharashtra govt formation

0



भाजपाने एकनाथ शिंदे यांना काय दिला मेसेज? Maharashtra govt formation

BJP CM's name still under wraps; all eyes on unwell Shinde's 'big decision'






  • महाराष्ट्रात 5 डिसेंबर रोजी  शपथविधी
  • तारीख निश्चित करुन एकनाथ शिंदे यांना मेसेज 
  • Maharashtra government formation highlights: New govt. to be formed on Dec 5


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यातच मुख्यमंत्री पदावरुन, खाते वाटपावरून मित्र पक्ष नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. शिवसेनेचे एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून गावी आहेत. अशातच भाजपाने राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होईल असे जाहीर केले आहे. हा एकनाथ शिंदे यांना थेट मेसेज आहे. त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय लवकर कळवावा, अशी ही रणनीती आहे.




महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्याची सध्या चर्चा होत आहे. 'या ऐतिहासिक शपथ विधीची प्रतिक्षा संपली आहे. आम्ही जनतेला त्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद देतो', अशी घोषणा बावनकुळे यांनी केली. 



दिल्ली दरबारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे गेले होते. ते परत आल्यानंतर भाजपा आणि शिंदे यांच्यात चर्चा झालेली नाही. त्याच दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्षांनी ही घोषणा केली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे (महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या मूळ गावी) या गावी आहेत. ते आज मुंबईत परत येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. महायुतीची आज संध्याकाळी बैठक होत आहे. त्यासाठी शिंदे मुंबईत असतील अशी माहिती समोर आली आहे.


#Maharashtra #BJP #EknathShinde #GovernmentFormation #PoliticalNews #ShivSena #Dec5 #OathTakingCeremony #ChandrashekharBawankule #Mumbai #PoliticalStrategy #ElectionUpdates #MaharashtraPolitics #NewGovernment #PoliticalDiscussion #Leadership #StatePolitics #BJPLeadership #MaharashtraAssembly #PoliticalAnnouncement


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)