ST प्रवास महागणार #MSRTC
MSRTC proposes 14.3% hike in bus fare, says else can't survive
Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Bus
निवडणूक संपताच ‘लालपरी’चा प्रवास महागणार
एसटीचा इतके % भाडेवाढीचा प्रस्ताव
महाराष्ट्र : विधानसभा निवडणूक होताच आता महागाईचे धक्के बसत आहेत. एसटीच्या (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) तिकिटात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना लालपरीने प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लालपरीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. एसटीच्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट किंमतीत भाडेवाढाची प्रस्ताव दिला आहे. गेल्या तीन वर्षात एसटीच्या तिकीटात वाढ करण्यात आलेली नाही.
एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे आता 14.3 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव आहे. म्हणजेच प्रवाशांना आता 100 रुपयांच्या तिकिटांमागे 15 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता महायुतीचे सरकार तो निर्णय मान्य करणार की फेटळून लावणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळ आर्थिक अडचणीत अडकले आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाला शासनाने दिलेल्या सवलतीवर पैसे खर्च करावे लागणार आहेत. मात्र ते पैसे देखील आता एसटी प्रशासनकडे नाहीत. मात्र या कारणामुळेच ही भाडेवाढ करणे प्रशासनाला अनिर्वाय आहे.
#Maharashtra #MSRTC #BusFareHike #PublicTransport #TravelCosts #EconomicIssues #MaharashtraTransport #STFareIncrease #PassengerConcerns #BudgetTravel #StateTransport #AffordableTravel #TransportChallenges #MaharashtraNews #TravelUpdates #FareProposal #PublicTransportCrisis #STTicketPrice #GovernmentDecisions #TravelInMaharashtra