बेळगाव : समितीला अजब सल्ला

0

 


बेळगाव : समितीला अजब सल्ला 





  • #महामेळावा
  • बेळगाव शहरातच महामेळावा घेतला जाईल - महाराष्ट्र एकीकरण समिती
  • समितीतर्फे दरवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलने



बेळगाव-belgavkar : कर्नाटक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिनोळी येथे आंदोलन करा किंवा मुख्यमंत्र्यांची ५ जणांच्या शिष्टमंडळाने भेट घ्यावी, असा अजब सल्ला जिल्हा पोलिस प्रशासनाकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिला गेला; मात्र समितीने बेळगाव शहरातच महामेळावा घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.


सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समितीतर्फे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जनजागृतीही सुरू आहे. त्यामुळे खडेबाजार पोलिस ठाण्यामध्ये समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून निरीक्षक गावी यांनी चर्चा केली. यावेळी सीमेवरील शिनोळी येथे आंदोलन करावे किंवा मुख्यमंत्रांना समितीच्या पाच जणांच्या शिष्टमंडळाने बेटून निवेदन द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. 


यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी महामेळावा शहरातच घेतला जाईल, तसेच मुख्यमंत्र्यांना भेटायचे असल्यास मोर्चा काढून निवेदन दिले जाईल, असे स्पष्ट केले. यापूर्वीही अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी समिती कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न करु नये. समितीतर्फे दरवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली जातात, याची दखल घ्यावी व महामेळावा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यावर पोलिस निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीशी चर्चा करुन माहिती दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.


यावेळी मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण-पाटील, ऍड. एम. जी. पाटील, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.



प्रशासन जाणीवपूर्वक दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असते. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकान्यांना भेटून मेळावा घेतला जाणार आहे, याची माहिती दिली आहे. खडेबाजार पोलिसांनी बोलावून मेळावा दुसऱ्या ठिकाणी घेण्याची सूचना केली आहे; मात्र, कोणत्याही परिस्थितीत मेळावा बेळगाव शहरात होईल. सर्वच भागांत मेळाव्याबाबत जनजागृती केली असून त्याला चांगला प्रतिसाद आहे. - मालोजी अष्टेकर, सरचिटणीस, मध्यवर्ती म. ए. समिती


#Belgaum #MaharashtraEkikaranSamiti #MES #Maharashtra #Karnataka #Protest #PeacefulProtest #Unity #PoliticalMeeting #PublicAwareness #CommunityGathering #SocialJustice #LocalPolitics #Demonstration #CivicEngagement #BelgaumRally #PoliticalActivism #MaharashtraUnity #KarnatakaAssembly #CitizensVoice #BelgaumEvents

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)