बेळगाव : तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि नगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका @कर्नाटक
Taluk and Zilla Panchayat Elections
We are ready to hold TP, ZP polls - Deputy Chief Minister DK Shivakumar
बेळगाव-belgavkar : कर्नाटक : येत्या फेब्रुवारीपर्यंत तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि नगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरु असल्याचे प्रदेश काँग्रेसचे (केपीसीसी) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
केपीसीसी कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली. मतदार यादीही तयार करण्यात येत आहे. निवडणुका थांबवता येणार नाहीत. फेब्रुवारीत मतदान होण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. दरम्यान, मंत्रिमंडळ पुनर्रचनेची चर्चा झालेली नाही. त्याची गरजही नाही. मंत्रिमंडळात एकच जागा रिक्त आहे. बेळगाव अधिवेशनानंतर ती भरण्याबाबत विचार केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकांबाबत प्रश्नांना उत्तर देताना शिवकुमार यांनी पुष्टी केली की फेब्रुवारीमध्ये अपेक्षित निवडणुकांची तयारी सुरू आहे.
Responding to questions about the taluk and zilla panchayat elections, Shivakumar confirmed that preparations are underway for elections expected in February.
#Belgaum #KarnatakaElections #TalukPanchayat #ZillaPanchayat #LocalBodyElections #DKShivakumar #CongressParty #ElectionPreparation #FebruaryElections #VoterList #PoliticalCampaign #DemocracyInAction #GrassrootsPolitics #CivicEngagement #ElectionUpdates #KarnatakaPolitics #PanchayatElections #VoteForChange #EmpowerLocalGovernments #CommunityLeadership
राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी हायकमांडची स्वतःची यंत्रणा आहे. मला याबद्दल तक्रार करण्याची गरज नाही. काँग्रेस पक्षाला मोठा इतिहास आहे. आमच्या सरकारने राबविलेल्या हमी योजनांचे खूप कौतुक झाले आहे. यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे अभिनंदन करण्यासाठी संघटना पुढे सरसावल्या आहेत. त्यांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या बॅनरखाली कार्यक्रमाचे आयोजनकरण्यात येत आहे. या कार्यक्रमामागील राजकीय हेतू स्पष्ट आहे. जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकीची तयारी स्वाभाविकच आहे, असेही ते म्हणाले.