उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवलं #Mahayuti #MaharashtraCM

0



उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवलं #Mahayuti #MaharashtraCM


ज्येष्ठ नेत्याचा दावा

 

CM कोण होणार याबाबत स्पष्टता नाही..




Maharashtra Assembly Election 2024 Result : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा झाला तरीही महायुतीकडून मुख्यमंत्री कोण होणार याबाबत स्पष्टता दिसत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले.




2024 विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. त्यामुळे त्यांना फसवले जाणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे फसवले गेले असल्याचे दिसून येत आहे. 





राज्यात 2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना उद्धव ठाकरे यांना फसवले, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांना फसविले आहे, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. निवडणुकीत पैशाचा वापर, सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाही नष्ट केली आहे. निवडणूक आयोग याबाबत शांत राहिला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमधील मतदानातील तफावत सध्या कळीचा मुद्दा झाला आहे. अनेक गावात मतदारांपेक्षा मतदानाचा टक्का अधिक असल्याचे समोर आल्याने विरोधकांच्या संशयाला जागा मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे.


#MaharashtraPolitics #EknathShinde #UddhavThackeray #Congress #BJP #Election2024 #MaharashtraElections #PoliticalDrama #Democracy #VoterFraud #ElectionCommission #PoliticalAllegations #MahavikasAghadi #PritvirajChavan #AssemblyElections #VotePercentage #PoliticalScandal #LeadershipCrisis #ElectionResults #PoliticalTensions
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)