धाडसी व्यावसायिक पाऊल @कर्नाटक #नंदिनी #KMF #Nandini

0

 


धाडसी व्यावसायिक पाऊल @कर्नाटक #नंदिनी #KMF #Nandini



Karnataka’s Nandini milk products enter Delhi-NCR markets





Karnataka's iconic Nandini Milk



  • कर्नाटक सरकारचे दुटप्पी धोरण
  • स्थानिक ब्रँडच्या अस्तित्वाचा मुद्दा
  • KMF enters Delhi-NCR



Karnataka Milk Federation launches Nandini products in Delhi-NCR market  : Siddaramaiah launches Nandini brand milk products : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सरकारी मालकीचा दूध ब्रँड नंदिनी दुधाची नवी दिल्लीत विक्री प्रारंभ करुन व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने एक मोठे पाऊल टाकले आहे. दिल्ली बाजारपेठेवर वर्चस्व असलेल्या अमुल व मदर डेअरीला शह देण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, यामुळे गेल्यावर्षी अमूलला कर्नाटकात विरोध करणाऱ्या राज्य सरकारचा दुटप्पीपणाही उघड झाला आहे.





सध्या कर्नाटकसह तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ व महाराष्ट्र या शेजारील राज्यात नंदिनीची उत्पादने विकली जातात. दिल्लीच्या माध्यमातून उत्तर भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचा नंदिनीचा प्रयत्नाचे वर्णन एक धाडसी व्यावसायिक पाऊल म्हणूनच करावे लागेल. दिल्लीत दूध आणि दह्यासारखी ताजी उत्पादने विकून नंदिनी ब्रँड भारतभर नेण्यासह बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्याचे कर्नाटक सरकारचे उद्दिष्ट आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने अमुलच्या कर्नाटकातील प्रवेशाला तीव्र विरोध केल्यानंतर अवघ्या वर्षभरात अंमलात आली आहे, हे विशेष.




 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डिसेंबर २०२२ मध्ये कर्नाटकातील मंड्या येथे एका दुग्धशाळेच्या उद्घाटनावेळी एक विधान केले होते. भारतातील दुग्धव्यवसायातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी अमुल आणि नंदिनी यांनी सहकार्य करावे, अशी सूचना त्यांनी केली. या विधानाचा संभाव्य विलिनीकरण म्हणून चुकीचा अर्थ लावला गेला. पुढे एप्रिल २०२३ मध्ये अमुलने बंगळुरात आपली ताजी उत्पादने सादर करण्याची योजना जाहीर केली. त्यानंतर कन्नड अभिमानाची ढाल करुन विरोधकांनी अमूलच्या राज्यातील प्रवेशाविरोधात राज्यव्यापी मोहीम उघडली होती. त्यावेळी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनीही अमुलचा विस्तार नंदिनीला हानी पोचवेल असा युक्तिवाद करुन अमुलला विरोध केला होता.






कर्नाटक रक्षण वेदिकेने तर अमुलविरोधात भूमिका घेऊन हा वाद आणखी वाढविला होता. अमुल दुधाच्या दुकानांबाहेर आंदोलन करुन नंदिनीचे वर्चस्व टिकवून ठेवण्याची मागणी करण्यात आली. सोशल मीडियावर 'सेव्ह नंदिनी' आणि 'गो बॅक अमुल' यासारख्या मोहिमा राबविण्यात आल्या. काँग्रेसने तर कर्नाटकच्या डेअरी उद्योगाला कमकुवत करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने अमुलच्या कर्नाटक प्रवेशाची सोय केल्याचा आरोप केला होता. 




वर्षभरापूर्वी कर्नाटकात अमुलच्या प्रवेशाला नंदिनीच्या अस्तित्वाला धोका असल्याचे सांगत नाकारणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीच आता नंदिनीच्या राष्ट्रीय विस्ताराला चालना दिली आहे. यावरुन कर्नाटक सरकारचे दुटप्पी धोरण अधोरेखित झाले आहे. 


कर्नाटकात अमुलला विरोध करताना स्थानिक ब्रँडच्या अस्तित्वाचा मुद्दा मांडण्यात आला होता. आता तोच मुद्दा नंदिनीचा विस्तार करताना दिल्लीत लागू होईल का, असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे, २०२३ मध्ये अमुलच्या प्रवेशावरुन राजकारण करणे हे विधानसभा निवडणुकीसाठी कन्नड अभिमानाचा फायदा घेण्यासाठी होते, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.


Karnataka's Nandini milk products made an entry into the Delhi-NCR market. 

Karnataka Chief Minister S Siddaramaiah and Deputy Chief Minister DK Shivakumar attended the launch event.


Nandini's cow milk will be sold at Rs 56 per litre, full cream milk at Rs 67 per litre, toned milk at Rs 55 per litre, and curd at Rs 74 per kg


#NandiniMilk #KarnatakaMilk #DelhiNCR #KarnatakaGovernment #MilkProducts #KMF #Siddaramaiah #LocalBrand #Amul #MotherDairy #DairyIndustry #IndianMilk #FreshProducts #MarketExpansion #KarnatakaPride #DairyCooperation #MilkDistribution #NandiniInDelhi #SupportLocal #DairyRevolution

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)