'बटेंगे तो कटेंगे' और 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे' विसरले वाटतयं?
Amid Waqf Bill Row, Maharashtra's Rs 10 crore boost to state board's functioning
- 'बटेंगे तो कटेंगे' और 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे' विसरले वाटतयं? @महाराष्ट्र
- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, GR मध्ये काय म्हटलंय?
- @महाराष्ट्र तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर
- वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसंच बळकटीकरणासाठी 10 कोटी
Maharashtra government's Rs 10 crore grant to Waqf board causes political stir
महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य वक्फ बोर्डाला वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसाठी 10 कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. अल्पसंख्यांक विभागाने याबाबतचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, महायुती सरकारमधील प्रमुख सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) वक्फ जमिनीच्या व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली होती. तसंच वक्फ बोर्डावर अनेक भाजप नेते टीका करताना दिसत होते.
मात्र, निवडणूक निकालानंतर महायुती सरकारने तातडीने वक्फ बोर्डाचं कामकाज आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी निधी मंजूर करून निर्णायक पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता या निर्णयाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. माहितीनुसार 2024-25 वर्षात अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण 20 कोटी एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामधून 2 कोटी अनुदान वक्फ बोर्डाला वितरित करण्यात आले आहे. तर आता 10 कोटी रुपये अदा करण्यात येणार आहेत. वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी हा निधी देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये सरकारही स्थापन होणार आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे. दरम्यान, इकडे मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होण्यापूर्वी किंवा सरकार स्थापन होण्यापूर्वीच एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार वक्फ बोर्डाला हा निधी देण्यात येत आहे.
वक्फ कायदा हा मुस्लिम समाजाच्या मालमत्ता आणि धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन आणि नियमन करण्यासाठी बनवलेला कायदा आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश वक्फ मालमत्तेचे योग्य संवर्धन आणि व्यवस्थापन सुनिश्चित करणे हा आहे जेणेकरून या मालमत्तांचा धार्मिक आणि धर्मादाय हेतूंसाठी वापर करता येईल. वक्फ हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ 'अल्लाहच्या नावाने केलेलं दान' असा होतो. इस्लाममध्ये, वक्फ मालमत्ता कायम धार्मिक आणि धर्मादाय ट्रस्ट म्हणून समर्पित आहे, धार्मिक हेतूंसाठी, गरिबांना मदत करणे, शिक्षण इ. वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक राज्यात वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. हे मंडळ वक्फ मालमत्तांची नोंदणी, संरक्षण आणि व्यवस्थापन करते.