#मुख्यमंत्रीपद शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम

0



#मुख्यमंत्रीपद शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम







Maharashtra CM suspense : BJP ‘thanks’ Eknath Shinde, Congress claims leader 'being pressured'



  • Eknath Shinde clears way for BJP CM in Maharashtra, says will support top brass’s decision
  • महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? 
  • शिंदे, फडणवीस आणि पवारांची शाहांसोबत बैठक




महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांच्या नजरा नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाकडे लागल्या आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले असून, भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 






पण, जोपर्यंत भाजप हायकमांड याची घोषणा करत नाही, तोपर्यंत फडणवीसांच्या नावावरही सस्पेन्स कायम असेल. शिंदे-फडणवीस आणि अजितदादा दिल्ली दौऱ्यावर जाणार असून, तिथे अमित शाहांची भेट घेणार आहेत. अमित शाहा महाराष्ट्रातील नेत्यांकडून सातत्याने अभिप्राय घेत आहेत आणि नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने राजकीय फायदा-तोट्याचे आकलन करत आहेत. 



शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय भाजपच्या कोर्टात ठेवला असून मी पंतप्रधान मोदी-अमित शाहांच्या निर्णयाला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. शिदें यांच्या या वक्तव्यानंतरच भाजपला अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. मात्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास मराठ्यांची नाराजी होण्याची भीती आहे. अशा स्थितीत भाजप कोणते राजकीय समीकरण तयार करते, हे पाहणे महत्वाचे असेल.




भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावावरील सस्पेन्स पुन्हा वाढला आहे. याचे कारण म्हणजे, गेल्या काही काळापासून पीएम मोदी आणि शाह त्यांच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का देत आहेत. सध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्याच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच यावरचा पडदा हटणार आहे. महायुतीतील तिन्ही पक्षातील समन्वय आणि सलोखा टिकवून ठेवण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करत आहे. 





देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजातील आहेत, तर एकनाथ शिंदे मराठा समाजातील आहेत. महाराष्ट्रात मराठा मतदार खूप महत्त्वाचा आणि निर्णायक आहे. महाराष्ट्रात भाजपचा राजकीय पाया ओबीसी आहे. महाराष्ट्रात भाजप सुरुवातीपासून ओबीसी मतांच्या जोरावर राजकारण करत आहे. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात भाजपच्या ओबीसी नेत्यांची नाराजी समोर आली होती. त्यामुळे मराठासोबत ओबीसी मतांचाही विचार भाजपला करावा लागणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी भाजप सर्व समीकरणांची पडताळणी करुन पाहत आहे.



Amid the deadlock over who will become the next Maharashtra chief minister after the Mahayuti’s landslide victory in the state, caretaker Chief Minister Eknath Shinde on Wednesday announced that the Shiv Sena would accept and support the decisions taken by Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah on the issue and that there would be “no obstacle” from their side.


#MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #BJPLeadership #CMSelection #PoliticalSuspense #MaharashtraCM #ElectionResults #PoliticalDrama #BJP #Congress #ShivSena #AmitShah #PoliticalMeeting #GovernmentFormation #MaharashtraNews #PoliticalUpdates #LeadershipCrisis #StatePolitics #PoliticalAnalysis


#MaharashtraPolitics #EknathShinde #ShivSena #MahayutiVictory #ChiefMinister #PoliticalDeadlock #NarendraModi #AmitShah #GovernmentFormation #PoliticalSupport #StateLeadership #MaharashtraCM #PoliticalUpdates #ShivSenaSupport #LeadershipCrisis #PoliticalAlliance #MaharashtraGovernment #PoliticalNews #StatePolitics #MaharashtraLeadership




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)