बेळगाव शहराचे सौंदर्यीकरण । Best Out of Waste

0

 

बेळगाव शहराचे सौंदर्यीकरण । Best Out of Waste



Gardening With Old Bottles and Belgaum CCB







  • हिवाळी अधिवेशन @बेळगाव
  • अधिवेशनाची जय्यत तयारी - महापालिका
  • बेळगाव शहराचे सौंदर्यीकरण
  • दुभाजकांवर रोपे लावण्याचे काम
  • पाण्याच्या टाकाऊ बाटल्यांचा वापर 



बेळगाव-belgavkar : पुढील महिन्यात बेळगावात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी महापालिकेने सुरु केली आहे. शहराच्या सौंदर्याकरणाला प्राधान्य देण्यात आले असून स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात येत आहे. 


आता प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांवर रोपे लावण्याचे काम हाती घेण्यात आले असून चार हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. या रोपांना वापरलेल्या पाण्याच्या बाटल्यांच्या उपयोग करुन पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.



  • Innovative Way to Reuse Plastic Bottles & Reduce Waste
  • Best Out of Waste
  • Gardening With Old Bottles: Ideas For Reusing Bottles


डिसेंबर ९ पासून सुवर्णसौधमध्ये सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार व विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी बेळगावात दाखल होणार आहेत. दहा दिवस चालणाऱ्या याअधिवेशनासाठी सर्वांचे वास्तव्य बेळगावातअसणार आहे. त्यामुळे, महापालिकेने शहर सौंदर्याकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यांतर्गत रंगरंगोटी, स्वच्छता, रस्ता दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात आली आहे. आता आयुक्त शुभा बी. यांच्या संकल्पनेनुसार प्रमुख मार्गांवरील दुभाजकांमध्ये चार हजार रोपे लावण्यात येत आहेत. दोन दिवसांपासून या कामाला सुरवात झाली असून आतापर्यंत अडीच हजार रोपे लावण्यात आली आहेत. पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.


रोपे लावल्यानंतर ती जगविण्यासाठी अभिनव उपाय करण्यात येत आहे. त्यासाठी पाण्याच्या टाकाऊ बाटल्यांचा वापर करण्यात येत आहे. तळ कापलेल्या व बुचाला छिद्र मारलेल्या या बाटल्या एका काठीला बांधून रोपाजवळ खोवल्या जात आहेत. बाटलीत पाणी ओतल्यानंतर ते ठिबक पद्धतीने झाडापर्यंत पोचत आहे. या कल्पनेमुळे टाकाऊ बाटल्यांचा वापर तर होत आहेच, पण झाडांना पाणीही मिळत आहे. वेळोवेळी या बाटल्यांमध्ये पाणी ओतून या उपक्रमात खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 



1. #BelgaumBeauty  

2. #BestOutOfWaste  

3. #GardeningIdeas  

4. #PlasticReuse  

5. #SustainableGardening  

6. #WasteReduction  

7. #UrbanBeautification  

8. #InnovativeGardening  

9. #EcoFriendly  

10. #BelgaumCCB #CCB 



1. #WinterSession  

2. #LegislativeAssembly  

3. #PoliticalDebate  

4. #GovernmentSession  

5. #PolicyMaking  

6. #StateAssembly  

7. #WinterParliament  

8. #LawMaking  

9. #CivicEngagement  

10. #PublicAffairs  

Gardening-With-Old-Bottles-and-Belgaum-CCB

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)