बेळगाव : @सुळेभावी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लक्ष्मी यात्रेपूर्वी

0

बेळगाव : @सुळेभावी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती  लक्ष्मी यात्रेपूर्वी





बेळगाव—belgavkar—belgaum : ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील ऐतिहासिक धार्मिक केंद्र असलेल्या सुळेभावी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती गावच्या लक्ष्मी यात्रेपूर्वी बसविण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.


सोमवारी सायंकाळी सुळेभावी येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या चौथऱ्याचे भूमिपूजन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यवेळी मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या.


त्या पुढे म्हणाल्या, सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने चांगली कामे होत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन यात्रेपूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येईल. शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या उभारणी समितीच्या सदस्यांच्या सल्ल्याने व सहकार्याने करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी कंत्राटदारांना दिल्या.


संपूर्ण सुळेभावी गावचा विकास होणे गरजेचे आहे. लक्ष्मी यात्रा भव्य प्रमाणात साजरी करण्यासाठी ₹ ३ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. मी प्रत्येकवेळी यात्रेला निधी देण्याचा प्रयत्न करत असते. मात्र, यावेळी भाऊ आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनीही पाच गावांच्या यात्रेसाठी अनुदान आणले आहे, अशी माहिती दिली.


यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, महेश सुगनेण्णावर, दत्ता बंडिगणी, नानप्पा पार्वती, मंजुनाथ पुजेरी, संभाजी यमूजी, देवण्णा भंगेण्णावर, बसवराज मॅगोटी, शंकरगौडा पाटील आदी उपस्थित होते.

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Sulebhavi

#Belgaum #Sulebhavi #ChhatrapatiShivajiMaharaj #StatueUnveiling #LaxmiYatra #HistoricalSite #CulturalHeritage #CommunityDevelopment #WomenEmpowerment #LocalGovernance #FestivalsOfIndia #MaharashtraCulture #ShivajiMaharaj #PublicInauguration #ReligiousCeremony #SupportLocal #VillageDevelopment #UnityInDiversity #IndianTraditions #HeritagePreservation

Statue-of-Chhatrapati-Shivaji-Maharaj-at-Sulebhavi

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)