बेळगाव : सतीश शुगर क्लासिक 2024 #BodyBuilding

0

 बेळगाव : सतीश शुगर क्लासिक 2024 #BodyBuilding


11th Mr Satish Sugars Classic


Belgaum District Level Body Building Competition





बेळगाव—belgavkar—belgaum : सतीश जारकीहोळी फाऊंडेशनतर्फे कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडीबिल्डर्स तसेच चिकोडी व गोकाक शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्यान ११ वी सतीश शुगर क्लासिक २०२४ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा १६ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता चिकोडी येथील आरडी हायस्कूल मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी एकूण ६ लाख ७५ हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत.



ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० व ८० हून अधिक अशा सात वजनी गटात होणार आहे. यास्पर्धेतील किताब विजेत्याला दीड लाख रुपये, उपविजेत्याला ६० हजार तर बेस्ट पोझरला दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाना अनुक्रमे रुपये १५ हजार, १४ हजार, १३ हजार, १२ हजार व ११ हजार तसेच पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांची वजने सकाळी १० वाजता घेतली जाणार आहेत.

जिल्हास्तरीय स्पर्धा भव्य प्रमाणात : सतीश जारकीहोळी फाऊंडेशन यांच्यातर्फे ११ वी सतीश शुगर क्लासिक २०२४ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा १६ डिसेंबर रोजी चिकोडी येथील आरडी हायस्कूल मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० व ८० हून अधिक अशा सात वजनी गटात होणार आहे. या स्पर्धेतील किताब विजेत्याला एक लाख रुपये, उपविजेत्याला ५५ हजार तर बेस्ट पोझरला १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाना अनुक्रमे रुपये १० हजार, ९ हजार, ८ हजार, ७ हजार व ६ हजार तसेच पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 



या स्पर्धेसाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी खासदार प्रियांका जारकीहोळी व युवा नेते राहुल जारकीहोळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अधिक माहितीसाठी आंतरराष्ट्रीय पंच अजित सिध्दण्णावर, गंगाधर एम., सुनील राऊत, रियाझ चौगुला, संजय देवरमनी यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

#BodyBuilding #Belgaum #SatishSugarClassic #FitnessCompetition #Bodybuilder #KarnatakaBodybuilding #Chikodi #Weightlifting #MuscleBuilding #FitnessGoals #Strongman #BodybuildingCompetition #HealthAndFitness #GymLife #FitFam #StrengthTraining #Athlete #BodyPositivity #FitnessMotivation #CompetitionReady
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)