बेळगाव : 'जीएसएस'चे माजी विद्यार्थी एकत्र येणार
G.S.Sc. College is organizing Mega Reunion of Graduates & Post Graduates Students
Grand Alumni Reunion at GSS College : “Seksarians 24 Reconnect and Rejoice”
GOVINDRAM SEKSARIA SCIENCE (GSS) College Belgaum
सर्व माजी विद्यार्थ्यांना एकाचवेळी एकत्र आणण्याची ही पहिलीच वेळ
बेळगाव—belgavkar—belgaum : जीएसएस महाविद्यालयाला नुकताच स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा प्राप्त झाला आहे. याबाबतची माहिती माजी विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे २८ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या मैदानावर 'सक्सेरियन्स २४ - रीकनेक्ट अँड रीजॉईस' हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे. याद्वारे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची योजना आहे, अशी माहिती प्राचार्य अरविंद हलगेकर यांनी दिली. ते रानडे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्राचार्य अरविंद हलगेकर म्हणाले, महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाल्याच्या आनंदात सहभागी होण्याबरोबरच जुन्या मित्र मैत्रिणींना पुन्हा भेटता यावे यासाठी महामेळाव्याचे प्रयोजन केले आहे. या महामेळाव्यात १९७० ते यंदाच्या बॅचपर्यंतचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यासाठी महामेळावा समिती स्थापन केली असून त्याद्वारे सर्व नियोजन केले जात आहे. एखाद्या महाविद्यालयाने सर्व माजी विद्यार्थ्यांना एकाचवेळी एकत्र आणण्याची ही पहिलीच वेळ असावी, असे त्यांनी सांगितले.
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. भरत तोपिनकट्टी म्हणाले, महामेळावा २८ डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी १० ते ५ या वेळेत होणार आहे. सकाळी १० ते ११ यावेळेत नोंदणी करता येईल. सकाळी ११ ते १२ या वेळेत उद्घाटन सोहळा व माजी प्राचार्य व प्राध्यापकांचा सन्मान होईल. दुपारी १२ ते २.३० पर्यंत माजी विद्यार्थ्यांना पुनर्मिलनाचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी बॅचनिहाय वर्ग खोल्या उपलब्ध करुन दिल्या जातील. दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत स्नेहभोजन झाल्यानंतर गॅदरिंगच्या धर्तीवर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी प्रभारी प्राचार्य अभय सामंत, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. संदीप देशपांडे, खजिनदार प्रा. पी. एस. पाटील, महामेळावा समितीचे सचिव प्रा. अनिल खांडेकर, अँँड. समीना बेग यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.हजारपेक्षा अधिकांचा सहभाग
सर्व माजी विद्यार्थ्यांना एकाचवेळी एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. हा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महामेळाव्याला हजारपेक्षा अधिक जण सहभागी होणार असून आतापर्यंत ५०० हून अधिक जणांनी ऑनलाईन नोंदणी केली असल्याचे महामेळावा समितीचे प्रमुख कुलदीप हंगिरगेकर यांनी सांगितले.
GSS College Belgaum Mega Reunion
#GSSCollege #Belgaum #AlumniReunion #Seksarians24 #ReconnectAndRejoice #GovindramSeksaria #MegaReunion #Graduates #PostGraduates #BelgaumEvents #CollegeMemories #OldFriends #Education #CulturalProgram #Networking #BelgaumCommunity #AutonomousCollege #AlumniNetwork #Celebration #TogetherAgain