भाजपने एकनाथ शिंदेंना CM पदाचा शब्द दिला होता का? #MahaYuti #CM

0

भाजपने एकनाथ शिंदेंना CM पदाचा शब्द दिला होता का? 


Eknath Shinde resigns, to act as caretaker Maharashtra chief minister





  • चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
  • निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली....
  • Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024
  • #Mahayuti #BJP #shivsena #NCP 
  • #EknathShinde #ChandrashekharBawankule 
  • एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला


महाराष्ट्र  : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. तर भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने मुख्यमंत्री भाजपचाच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. 





महायुतीत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या. तर शिवसेना शिंदे गटाने 57 जागांवर विजय मिळवलाय. यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते. शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली जात आहे. त्यातच भाजपने निकालापूर्वी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदाचा शब्द दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आता यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 




चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करू नका. तिन्ही पक्षप्रमुख एकत्र बसून निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरेंची अवस्था शोले चित्रपटाच्या असरानीसारखी झाली आहे, अर्धा इकडे जातो, अर्धा तिकडे जातो. त्यांचे आमदारही उद्धव ठाकरेंचे ऐकत नाहीत, असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 




एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदेंनी आज राजीनामा सोपवला. तर शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रीमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो.




दरम्यान, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणतीही नाराजी नाही. त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितलं आहे. ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 


  • BJP
  • Shivsena
  • MahaYuti
  • Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Maharashtra Election 2024
  • Maharashtra Assembly Elections 2024
  • Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024

#Maharashtra #EknathShinde #BJP #ShivSena #NCP #ChandrashekharBawankule #Mahayuti #Election2024 #PoliticalNews #MaharashtraPolitics #CMResignation #VidhanSabha #ShindeGroup #DevendraFadnavis #AjitPawar #Governor #PoliticalDrama #ElectionResults #MaharashtraElections #CaretakerCM #PoliticalAlliance




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)