बेळगाव : कॅम्पमधील हायस्ट्रीट ‘छत्रपती शिवाजी महाराज रोड’

0

 बेळगाव : कॅम्पमधील हायस्ट्रीट ‘छत्रपती शिवाजी महाराज रोड’





  • बेळगावातील 55 संघटना, मंडळांचे कॅन्टोन्मेंट बोर्डला पाठिंब्याचे पत्र
  • भारतीय इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व, मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

Belgaum Cantonment Board renames High Street Road in Camp after Chhatrapati Shivaji Maharaj

बेळगाव-belgavkar : अनेक जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे कॅम्पमधील रस्त्यांना देण्यात आली होती. मागील अनेक वर्षांपासून ही नावे अशीच होती. अखेर ही नावे बदलून त्या ठिकाणी देशासाठी योगदान दिलेले वीरपुरुष, तसेच हुतात्मा जवानांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला कॅन्टोन्मेंट बोर्ड मिटींगमध्ये मंजुरी देण्यात आली. तसेच आक्षेप नोंदविण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. 


बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डने कॅम्पमधील हायस्ट्रीट रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा केली. परंतु, सदर निर्णयाला कन्नड संघटनेने आक्षेप घेतला होता. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे असल्याने या रस्त्याला नामकरण करण्याचा कॅन्टोन्मेंटचा निर्णय योग्य असून या निर्णयाला बेळगावमधील अनेक संघटना, युवक मंडळे, सामाजिक संस्थांनी पाठिंब्याचे पत्र कॅन्टोन्मेंट बोर्डला दिले आहे. 



एका कन्नड संघटनेने कॅम्पमधील हायस्ट्रीट रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यास विरोध केला. त्यामुळे कॅन्टोन्मेंटने आक्षेप नोंदविण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत दिली होती. या दरम्यान कोणत्याही संघटनेने नामकरणाला आक्षेप नोंदविला नाही. तर बेळगावमधील 55 हून अधिक गणेशोत्सव मंडळे, युवक मंडळे, शिवजयंती मंडळे, तसेच नगरसेवकांनी पाठिंब्याचे पत्र कॅन्टोन्मेंटला सुपूर्द केले. त्यामुळे आता कॅम्प येथील हायस्ट्रीट रोडच्या नामकरणाला पाठबळ मिळाले आहे. कॅन्टोन्मेंटचे अभियंता सतीश मण्णूरकर यांनी निवेदन स्वीकारले.


#Belgaum #ChhatrapatiShivajiMaharaj #HighStreetRoad #CantonmentBoard #MarathaEmpire #IndianHistory #SupportForShivaji #BelgaumYouth #CulturalHeritage #RoadRenaming #HistoricalFigures #UnityInDiversity #LocalOrganizations #Ganeshotsav #ShivJayanti #CommunitySupport #Patriotism #CivicEngagement #HeritagePreservation #BelgaumPride

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)