बेळगाव : #महामेळावा #समिती
MES Mahamelava
- व्हॅक्सीन डेपो मैदानावर महामेळावा
- सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मराठी भाषिकांना आपली ताकद दाखवून द्यावी लागणार
- ९ डिसेंबर रोजी बेळगावात महामेळावा
- #महामेळावा शहरातील ३ मैदानांचा प्रस्ताव
- बेळगाव शहरात परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली, तरी...
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात यंदाही व्हॅक्सीन डेपो मैदानावर महामेळावा आयोजित करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन देऊन सीमावासीयांचा निषेध करण्याचेही ठरले.
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मराठी भाषिकांना आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी 9 डिसेंबर रोजी बेळगावात महामेळावा घेण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच महामेळावा घेण्यासाठी समितीतर्फे शहरातील ३ मैदानांचा प्रस्ताव प्रशासनाकडे दिला जाणार आहे.
महामेळाव्यासह राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची परवानगी द्यावी, यासाठीही अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आयोजित केल्या जाणाऱ्या महामेळाव्याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी मराठा मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. यावेळी किणेकर यांनी सांगितले की, बेळगाव शहर सीमालढ्याचे केंद्र आहे. त्यामुळे शहरात परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली, तरी कार्यकत्यांनी महमेळावा यशस्वी करण्यासाठी आतापासूनच तयारीला लागावे. तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी अधिक कार्यक्रम हाती घ्यावे लागणार आहेत. त्याबाबतचे नियोजनदेखील करावे लागणार आहे. भविष्यात सीमाप्रश्न स्वतःच्या ताकदीवर सोडवावा लागणार आहे. त्यासाठी लढा अधिक तीव्र करावा, लागणार आहे. त्यामुळे कार्यकत्यांनी तयारीला लागावे, असे मत व्यक्त केले.
मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी कार्यकत्यांना चळवळ कायम ठेवावी लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात समितीतर्फे आयोजित केला जाणारा प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील करणे गरजेचे आहे. बेळगाव शहर सोडून इतर ठिकाणी महामेळावा आयोजित केला जाऊ नये. तसेच परवानगीचा अर्ज दाखल करताना तीन मैदानांचा प्रस्ताव प्रशासनाकडे द्यावा. याचबरोबर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय घ्यावा. तसेच महामेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, याचाबतची माहितीदेखील प्रशासनाला द्यावी, अशी सूचना केली. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कराड येथे भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. सीमाखटल्याबाबत साक्षी, पुरावे नोंदवण्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्यामुळे कार्यकत्यांनी निराश होऊ नये, असे मत व्यक्त केले.
मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी सांगितले की, राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला विरोध कायम ठेवला पाहिजे. सत्ताधारी जाणीवपूर्वक परवानगी नाकारण्याचा प्रयत्न करतात, मात्र समिती महामेळावा घेण्यावर ठाम राहिले आहे. त्यामुळे कार्यकत्यांनी आतापासूनच महामेळाव्याच्या तयारीला आणि जनजागृतीला सुरुवात करावी, असे मत व्यक्त केले.
ऍड. एम. जी. पाटील, युवा नेते आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, रणजित चव्हाण पाटील, खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, बाळासाहेब शेलार, डी. बी. पाटील, मनोहर संताजी, ऍड. प्रसाद सडेकर, मनोहर हुंदरे, पिऊश हावळ आदींनी मनोगत व्यक्त केले. बी. डी. मोहनगेकर आदी उपस्थित होते. बैठकीला विकास कलघटगी, बी. एस. पाटील, आर. के, पाटील, एम. बी. गुरव, अनिल पाटील, बाळासाहेब फगरे, मोणाप्पा पाटील आदी उपस्थित होते.
The MES meeting decided to organize a grand rally at the Vaccine Depot Ground this year against the Karnataka government's legislative session. It was also decided to submit a memorandum to Chief Minister Siddaramaiah and protest against the border residents.
#belgaum #MES #Belgavkar #Karnataka.
1. #Mahamelava
2. #Belgaum
3. #Maharashtra
4. #MarathiUnity
5. #Karnataka
6. #VaccineDepot
7. #Protest
8. #MarathiLanguage
9. #PoliticalRally
10. #BelgaumRally
11. #UnityInDiversity
12. #MaharashtraEkikaran
13. #CivicRights
14. #BorderIssue
15. #MarathiPride
#PoliticalAwareness
#BelgaumProtest
#MaharashtraMovement