बेळगाव : लवकरचं भाजप-निजद युतीचे सरकार @कर्नाटक

0

 

बेळगाव : लवकरचं भाजप-निजद युतीचे सरकार @कर्नाटक 





'JD(S) and BJP will form coalition govt in Karnataka again' 


  • सर्व २२४ मतदारसंघांचा दौरा करणार
  • माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा
  • दररोज २-३ विधानसभा मतदारसंघात फिरणार
  • BJP Parliamentary Board member and former chief minister B S Yediyurappa



बेळगाव-belgavkar : आगामी काळात राज्यात भाजप-निजद युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी म्हटले आहे.



मंगळवारी पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा म्हणाले, माजी पंतप्रधान एच. डी.देवेगौडा, निजदचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी आपली संमती दर्शविली आहे. त्यामुळे आम्ही कामाला लागणार आहोत. मला माजी मंत्री, माजी आमदार म्हणणे खूप बोचते. राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मी राज्यातील सर्व २२४ मतदारसंघांचा दौरा करणार आहे. दररोज २-३ विधानसभा मतदारसंघात फिरणार आहे. जनतेने सहकार्य करावे.


राज्यात पुन्हा भाजपची सत्ता यावी, अशी माझी इच्छा आहे. दावणगिरी येथूनच कामाला सुरुवात होणार आहे. राज्यातील भाजपमध्ये फूट पडल्याचे खरे आहे. पक्षहिताच्या दृष्टीने सर्वांशी चर्चा करून सर्व समस्या मार्गी लावल्या जातील, असेही माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा  पुढे म्हणाले.


Janata Dal (Secular)

#BJP #JDS #Karnataka

#BSYediyurappa

#BJPJDSAlliance

BJP-JDS-alliance-government-in-Karnataka


1. #BJP  

2. #JDS  

3. #Karnataka  

4. #BSYediyurappa  

5. #BJPJDSAlliance  

6. #KarnatakaPolitics  

7. #CoalitionGovernment  

8. #PoliticalCampaign  

9. #Election2023  

10. #Belgaum  

11. #BJPInKarnataka  

12. #JDSupporters  

13. #KarnatakaElections  

14. #BJPLeadership  

15. #PoliticalStrategy  

16. #YediyurappaTour  

17. #KarnatakaGovernment  

18. #BJPUnity  

19. #JDSAlliance  

20. #KarnatakaFuture  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)