पुन्हा ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा.... पण कशाला #EVM #BalletPaper
Halla Bol: Ballot Paper Yatra निकालेंगे Rahul Gandhi | EVM Controversy
- Maharashtra Congress to launch campaign demanding return of ballot papers
- 'We don't want EVMs, we want ballot paper': Congress chief Mallikarjun Kharge
- मतपत्रिकेवर निवडणुक घेण्यासाठी जनआंदोलन
मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी संविधानदिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केली आहे. भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला होता आता पुन्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी यात्रा काढली जाणार आहे.
महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरु केली जाणार आहे. जनतेच्या सह्यांचे लाखो अर्ज राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश व निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहेत.
लोकशाही वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. लोकशाही व्यवस्थेत जनताच सर्वोच्च असून जनभावनेचा आवाज काँग्रेस उठवत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे, पण आपण एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुरु करणार आहे.
#BallotPaper #EVM #RahulGandhi #MaharashtraCongress #Democracy #ElectionReform #PublicMovement #VoteForChange #CongressParty #SaveDemocracy #PeoplePower #ElectionIntegrity #BallotBox #PoliticalCampaign #CitizenVoices #MaharashtraPolitics #VoteForBallots #ElectionAwareness #GrassrootsMovement #UnityForChange