बेळगाव : @शाहूनगर मुख्य चौक आता राजर्षी शाहू महाराज
बेळगाव—belgavkar—belgaum : शाहूनगर येथील मुख्य चौकाला राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेत गुरुवारी संमत करण्यात आला. यावेळी शाहूनगर आणि आझमनगरच्या सीमेबाबत संभ्रम असल्याचे सांगत विरोधी गटाने सभात्याग केला. जोपर्यंत सीमेचा वाद मिटत नाही, तोपर्यंत चौक आणि स्वागत कमानीचा विषय घेवू नये, अशी मागणी करण्यात आली होती. पण, ससत्ताधारी गटाने बहुमताने ठराव संमत केला.
नगरसेवक श्रेयस नाकाडी यांनी सभागृहात संगमेश्वरनगर येथील चौकाला कृषी चौक आणि पेट्रोल पंप येथील चौकाला राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देणे आणि माजी उपमहापौर रेश्मा पाटील यांनी मंजूर केलेली स्वागत कमान उभारणीचा विषय मांडला. हा विषय मांडताच नगरसेवक शाहिदखान पठाण, विरोधी गटनेते मुजम्मील डोणी आणि आमदार राजू सेट यांनी आक्षेप घेतला. आमदार राजू सेट यांनी हा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे विषय शांततेने हाताळणे आवश्यक आहे.
शाहूनगर आणि आझमनगर यांच्या सीमा निश्चित झाल्यानंतर यावर निर्णय घेण्यात यावा. आम्हाला सर्व महापुरुष वंदनिय आहेत, असे सांगितले. तर नगरसेवक नाकाडी, राजशेखर डोणी यांनीही सीडीपीनुसार हा भाग शाहू नगरचाच आहे, त्यामुळे त्याठिकाणी नामकरण आणि स्वागत कमान उभारणीचा विषय लावून धरला. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता.
महापौर सविता कांबळे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत दुपारच्या जेवणानंतर विषयावर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. दुपारी पुन्हा हा विषय चर्चेला आला. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी गट आक्रमक झाला होता, गोंधळ झाला. सत्ताधारी गटाने नियमानुसार आम्ही चौकाचे राजर्षी शाहू महाराज असे नामकरण करणार आहोत, असे सांगितल्यामुळे विरोधी गटाने सभात्याग करुन निषेध व्यक्त केला. आपल्या मागण्यांवर विचार करण्यात येत नाही, असा आरोप करण्यात आला. या गोंधळातच नामकरण आणि स्वागत कमानीचा ठराव संमत करण्यात आला.
#Belgaum #ShahuNagar #RajashriShahuMaharaj #BelgaumMunicipality #CityNaming #LocalPolitics #CommunityDebate #PublicSquare #CivicEngagement #HeritageNaming #CivicIssues #PoliticalDispute #LocalGovernance #PublicDiscussion #CityDevelopment #CivicPride #HistoricalFigures #UrbanPlanning #CommunityVoices #CivicResponsibility

