बेळगाव : तर कर्नाटकची वाहने अडवणार @महाराष्ट्र #MES #Mahamelava

0

 


बेळगाव : तर कर्नाटकची वाहने अडवणार @महाराष्ट्र #MES #Mahamelava





  • महाराष्ट्र एकीकीरण समितीचा बेळगावात महामेळावा @कर्नाटक
  • महामेळाव्याला परवानगी नाकारल्यास कर्नाटकची वाहने अडवू
  • शिवसेना ठाकरे गटाचा इशारा @कोल्हापूर



बेळगाव-belgavkar : कर्नाटक सरकारच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात यंदाही महामेळावा आयोजित करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. बेळगाव येथे ९ डिसेंबर रोजी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास परवानगी नाकारल्यास महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करुन कर्नाटकातील वाहनांना अडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. 



याबाबचे निवेदन कोल्हापूर प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. बेळगाव येथे कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन ९ डिसेंबर पासून सुरु होत आहे. या अधिवेशन काळात महाराष्ट्र एकीकीरण समितीने ९ रोजी महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्याला रीतसर परवानगी मिळावी यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला आहे. 



पण कर्नाटक सरकार समितीला महामेळावा घेऊ देत नाही. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये बंदी घातली जाते. हे लोकशाहीला धरुन नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. 



यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार, सह संपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.



#Belgaum #Karnataka #Maharashtra #ShivSena #UddhavThackeray #MaharashtraEkikaranSamiti #Protest #PoliticalRally #BorderDispute #VaccineDepot #KarnatakaAssembly #December9 #Democracy #Unity #RegionalPolitics #Kolhapur #SanjayShinde #MaharashtraGovernment #KarnatakaGovernment #PublicGathering

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)