बेळगाव : महागाई भत्त्यात एवढी झाली वाढ @कर्नाटक
Dearness Allowance raised for Karnataka govt. staff
बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २.२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सातव्या राज्य वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार आता भत्ता मूळ वेतनाच्या ८.५० टक्क्यांवरुन १०.७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. ही वाढ 1 ऑगस्ट २०२४ पासून लागू होणार आहे.
महागाई भत्त्यासाठी मूळ वेतन म्हणजे सरकारी कर्मचारी पदावर रुजू झाल्यापासून लागू असलेले वेतन असून, त्यात वैयक्तिक वेतनवाढ, अतिरिक्त वेतनवाढ असेल तर तीही समाविष्ट करण्यात आली आहे. फरक वेतन कधी मिळणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.
सेवारत कर्मचाऱ्यांच्या वेतनासह निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यातही २.२५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यांना ऑगस्टपासूनच ही वाढ लागू होणार आहे. कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष षडाक्षरी यांनी वेतनात तसेच निवृत्ती वेतनात २.२५ टक्के वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे लागू व्हाव्यात, यासाठी सरकारी कर्मचारी फेब्रुवारी २०२३ पासून मागणी करत आहेत. मात्र सरकारी तिजोरीवर बोजा पडणार असल्याने सरकार टप्प्याटप्प्याने या शिफारशी लागू करत आहे.
सामान्यपणे महागाई भत्ता ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाला की तो मूळ वेतनात समाविष्ट केला जातो. त्यानुसार गेल्या वर्षी महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्यात आला होता.
#Belgaum #Karnataka #DearnessAllowance #GovernmentEmployees #SalaryIncrease #DAHike #SeventhPayCommission #CostOfLiving #EmployeeBenefits #KarnatakaGovernment #PublicSector #SalaryRevision #InflationRelief #BelgaumNews #KarnatakaUpdates #GovernmentJobs #EmployeeWelfare #RetirementBenefits #SalaryStructure #KarnatakaState
ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರಿಗೆ ತುಟ್ಟಿ ಭತ್ಯೆಯನ್ನು ಜುಲೈ 1, 2024 ರಿಂದ 8.50% ರಿಂದ 10.75% ಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿಸಲಾಗಿದೆ. ಪರಿಷ್ಕೃತ ದರಗಳು ಆಗಸ್ಟ್ 1, 2024 ರಿಂದ ಅನ್ವಯವಾಗುತ್ತವೆ.