बेळगाव : हलगा-मच्छे बायपास । शेतकऱ्यांचा दावा फेटाळला #bypass

0

 


बेळगाव : हलगा-मच्छे बायपास । शेतकऱ्यांचा दावा फेटाळला #bypass







बेळगाव-belgavkar : हलगा-मच्छे बायपासप्रकरणी न्यायालयाने शेतकऱ्यांचा एक दावा मंगळवारी फेटाळला. त्यामुळे शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासमोरील एक अडथळा दूर झाल्यामुळे बायपास कामाचा वेग वाढणार आहे.



हलगा-मच्छे बायपासचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय या रस्त्यावरून कोणतीही रहदारी करण्यात येऊ नये, रस्ता वापरण्यात येऊ नये, असा दावा शेतकऱ्यांनी सातवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. या दाव्यावर अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने शेतकऱ्यांचा हा दावा फेटाळून लावला. या निकालाविरोधात वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. 



महिनाभराच्या आत या निकालाविरोधात वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाद मागण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. न्यायालयात शेतकऱ्यांचा मूळ दावा कायम आहे. जोपर्यंत झिरो पॉईंट निश्चित होत नाही, तोपर्यंत बायपास करण्यात येऊ नये, हा दावा न्यायालयात कायम आहे. पण, झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय रस्ता वापर करण्यात येऊ नये, या दावा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या असल्या तरी महिनाभरात पुन्हा न्यायालयात जाऊन दाद मागण्यात येणार आहे, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. 


शेतकऱ्यांचा एक दावा फेटाळला आहे. हा दावा फेटाळताना नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता या निकालाविरोधात ३० दिवसांच्या आत वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. शेतकऱ्यांचा मूळ दावा कायम आहे. रविकुमार गोकाककर, शेतकऱ्यांचे वकील



हलगा-मच्छे बायपास हा कर्नाटक राज्यातील बेळगाव शहराच्या जवळचा एक महत्त्वाचा रस्ते प्रकल्प आहे. या बायपासचे उद्दिष्ट शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे आणि उत्तर-दक्षिण प्रवास अधिक सुलभ बनवणे आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

  1. स्थान: हलगा आणि मच्छे या गावांदरम्यानचा रस्ता, जो बेळगाव शहराच्या पश्चिमेकडून जातो.
  2. लांबी: अंदाजे 8-9 किलोमीटर (अधिकृत तपशीलावर अवलंबून).
  3. उद्दिष्ट:
    • राष्ट्रीय महामार्ग (NH) 4A आणि 48 यांना जोडणे.
    • शहरामध्ये वाहतूक कोंडी टाळणे.
    • मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक अधिक गतीमान करणे.

महत्त्व:

  • विकासाला चालना: हा बायपास स्थानिक आणि आंतरराज्य वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे, जो औद्योगिक विकासाला गती देतो.
  • वाहतुकीस मदत: बेळगावमधून जाणाऱ्या ट्रक, कंटेनर आणि मोठ्या वाहनांची संख्या कमी होऊन प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवास शक्य होईल.
  • वेळ वाचवणे: बायपासमुळे बेळगावमधून जाणाऱ्या प्रवासाचा वेळ कमी होईल.

सध्यस्थिती:

हलगा-मच्छे बायपासच्या बांधकामाबाबत वेळोवेळी अपडेट्स मिळत असतात. त्याची प्रगती व सरकारच्या धोरणांवर अवलंबून वेळेत बदल होऊ शकतो. तुम्हाला प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास किंवा सध्याची प्रगती जाणून घ्यायची असल्यास, कर्नाटक महामार्ग प्राधिकरण किंवा संबंधित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधणे उपयुक्त ठरू शकते.




The Halga-Macche bypass is a road that connects the Belagavi-Goa highway with the Pune-Bengaluru National Highway-4. It's part of the Bharatmala project. Here's some information about the Halga-Macche bypass: 

Construction

Construction on the 9 km bypass resumed in March 2024 after years of opposition from farmers. The project is expected to be completed within 15 months. 

Land acquisition

The government began acquiring land in 2011, with additional rounds in 2019 and 2021. The total compensation amount is ₹45 crore, up from the initial ₹15 crore. 

Farmers' opposition

Farmers have opposed the project, claiming that the land is fertile and irrigated. They've also sought a change in the alignment of the bypass. 

Legal hurdles

Farmers have filed petitions for project modifications, but appeals in both the Karnataka High Court and the Supreme Court have not changed the alignment. 

Benefits

The bypass is expected to reduce traffic congestion in Belagavi city and bring relief to heavy traffic between Karwar, Goa, Hyderabad, and Kolhapur.

#Belgaum #HalgaMachheBypass #FarmersRights #CourtDecision #LegalBattle #InfrastructureDevelopment #HighwayAuthority #FarmersProtest #JusticeForFarmers #ZeroPointIssue #BypassConstruction #AgriculturalLand #LegalChallenge #FarmersVoice #CourtRuling #BelgaumNews #FarmersStruggle #HighwayConstruction #LandRights #FarmersUnity

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)