बेळगाव : एचएसआरपी मुदतवाढ @कर्नाटक #HSRPDeadline
Karnataka : You have a month more, HSRP deadline extended to year-end
High Security Registration Plates (HSRP)
- एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपीची सक्ती
- एचएसआरपी नसेल तर पहिल्यावेळी ५०० रुपये दंड
- दुसऱ्यांदा सापडल्यास १००० रुपये दंड
बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी (एचएसआरपी) राज्य शासनाने वर्षअखेरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर दंड आकारण्यास सुरुवात केली जाईल, असा इशारा दिला आहे. आतापर्यंत पाचवेळा मुदतवाढ देण्यात आली असून यापुढे कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे (laser-engraved 12-digit alphanumeric permanent identification number linked to vehicle).
The Karnataka state has decided to extend the last date for registration of the High Security Registration Plate (HSRP) upto December 31 this year. The present deadline, its fifth one, expires on Saturday (November 30). This follows a request for the same, made by the transport commissioner’s office to the transport minister and secretary, citing that a significant number of vehicles have not yet installed HSR plates to their vehicles.
याबाबतचे प्रकरण न्यायालयात असून बुधवारी त्यावर निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर मुदत आणि दंडाच्या रकमेबात सर्वकाही स्पष्ट होणार आहे. याआधी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण, ही मुदत संपल्याने परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन याबाबत पुन्हा एकदा मुदतवाढ दिली. एसएसआरपी प्लेट तयार करण्याची परवानगी आदींबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे. ४ डिसेंबरला त्यावर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. एसएसआरपी नसेल तर आकारण्यात येणाऱ्या दंडाविषयीही न्यायालयाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
एचएसआरपी नोंदणीसाठी असणाऱ्या वेबसाईटवर गेल्यानंतर अनेकदा सर्व्हर डाऊच्या समस्येला सामोर जावे लागत आहे. सर्व्हर असताना ठरावीक वर्गातील माहिती भरताना ती योग्य नसल्याचे सांगितले जाते. अचूक माहिती भरली तरी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत असल्याच्या तक्रारी संबंधित वाहनधारकांनी केल्या आहेत. एचएसआरपी नसेल तर पहिल्यावेळी ५०० रुपये आणि दुसऱ्यांदा सापडल्यास १००० रुपये असा दंड आकारला जाणार आहे.
एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपीची सक्ती करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये याबाबतचा आदेश सर्वप्रथम देण्यात आला. यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. २०१९ मधील वाहनांची संख्या दोन कोटींवर आहे. त्यापैकी आतापर्यंत ५० लाख वाहनांनी एचएसआरपी नोंदणी केली आहे. अद्यापही दीड कोटी वाहनधारक प्रतीक्षेत आहेत. गतवर्षी ऑगस्टमध्ये आदेश दिल्यानंतर १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली. मागणीनुसार १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर २९ मेपर्यंत पुन्हा मुदत वाढवली. तेथून पुढे जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली. पुन्हा एकदा जुलै ते सप्टेंबरपर्यंत वाढीव मुदत दिली होती.
What is an HSRP? An HSRP is an aluminium plate with a hot-stamped chromium-based hologram containing Ashoka Chakra and a laser-engraved 12-digit alphanumeric permanent identification number linked to vehicle details on the Vahan portal.
It is affixed at the front and the back with two snap rivets that cannot be removed or reused. The HSRP requirement is aimed at identifying all vehicles plying on roads, reducing vehicle-borne crimes and preventing tampering with or counterfeiting of number plates.
#HSRP #Karnataka #HighSecurityRegistrationPlates #Belgaum #Belgavkar #VehicleRegistration #DeadlineExtension #TransportDepartment #VehicleCompliance #RegistrationPlates #TrafficRules #RoadSafety #VehicleOwners #Fines #GovernmentNotification #TransportMinister #LegalUpdates #ServerIssues #RegistrationProcess #VehicleIdentification