ठरले...! 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्र CM
Mahayuti government to take oath on December 5
PM मोदी शपथविधीला उपस्थित राहणार
Maharashtra Assembly Election 2024 Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. एकीकडे विरोधक ईव्हीएमविरोधात आक्रमक होत असून, दुसरीकडे मोठा जनाधार मिळूनही महायुती सत्तास्थापनेसाठी करत असलेला उशीर राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.
अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. मोठा जनाधार मिळूनही महायुती सत्तास्थापनेसाठी करत असलेला उशीर चर्चेचा विषय आहे. यातच महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधी कधी होणार, कोण येणार आणि कुठे होणार, याबाबतची घोषणा केली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी X वर एक पोस्ट शेअर करत शपथविधी सोहळ्याविषयी माहिती दिली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
Maharashtra BJP chief Chandrashekar Bawankule on Saturday said the new Mahayuti government would be sworn in on December 5, even as the suspense over the CM's face remains largely intact.
"The oath-taking ceremony of the Mahayuti Government in Maharashtra will be held in the presence of Honourable Prime Minister Narendra Modi Ji on Thursday, December 5, 2024, at 5 PM at Azad Maidan, Mumbai," state BJP chief Chandrashekhar Bawankule stated on X on Saturday evening.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता जवळपास आठवडा आला, तरी महायुतीचे सरकार कधी स्थापन होणार, याबाबत स्पष्टता येत नव्हती. परंतु, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ट्विटने यावरील अनिश्चिततेचे मळभ दूर केले आहे. असे असले तरी मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण असणार, महायुतीतील किती आमदार शपथ घेणार, मंत्रिमंडळात कोण असणार, खातेवाटप कसे होणार, यांसारख्या अनेक प्रश्नांवर सस्पेन्स कायम आहे.
#Maharashtra #Mahayuti #CM #OathCeremony #ChandrashekarBawankule #NarendraModi #Mumbai #AzadMaidan #BJP #Election2024 #PoliticalEvent #GovernmentFormation #MaharashtraPolitics #EVM #AssemblyElections #PoliticalNews #India #MaharashtraBJP #Leadership #SwearingInCeremony #December5