फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब @महाराष्ट्र
- निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय
- सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री
- ‘लाडक्या बहिणी’ शपथविधीला उपस्थित राहणार
महाराष्ट्र : मुंबईः २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची असल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुका महायुतीनं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या. त्यानंतर आलेल्या निकालांमध्ये भाजपाला १३२ जागा मिळाल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद जाईल अशीच चर्चा पाहायला मिळाली. पण त्यानंतर ११ दिवस उलटल्यानंतरही नावाची घोषणा न झाल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आल्याचं दिसून आलं.
भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव विधीमंडळ गटनेता म्हणून निश्चित झालं आहे. त्यामुळे गुरुवारी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील. भाजपची कोर कमिटीची बैठक संपली आहे. निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीला काहीच क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे.
महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘लाडक्या बहिणी’ शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. शपथविधीच्या ठिकाणी ‘लाडकी बहीण कक्ष’ उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी १० हजार महिलांची बसण्याची व्यवस्था केली आहे. सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे.
भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे निमंत्रण
भजनलाल शर्मा - मुख्यमंत्री, राजस्थान
मानिक साहा - मुख्यमंत्री, त्रिपुरा
प्रमोद सावंत - मुख्यमंत्री, गोवा
नायब सिंग सैनी - मुख्यमंत्री, हरियाणा
प्रेमा खांडू - मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश
विष्णूदेव साय - मुख्यमंत्री, छत्तीसगढ
मोहन यादव - मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
कॉनराड संगमा - मुख्यमंत्री, मेघालय
योगी आदित्यनाथ - मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
नितीन कुमार - मुख्यमंत्री, बिहार
चंद्राबाबू नायडू - मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश
भूपेंद्र पटेल - मुख्यमंत्री, गुजरात
पुष्कर सिंग धामी - मुख्यमंत्री, उत्तराखंड
हिमंत बिश्व शर्मा - मुख्यमंत्री, आसाम
Maharashtra CM LIVE: In Key Meeting, Fadnavis’s Name Proposed As BJP Legislature Party Leader
In the core committee meeting, it has been decided that senior BJP leaders Chandrakant Patil and Sudhir Mungantiwar will propose Devendra Fadnavis’s name before all MLAs to appoint him as the leader of the legislative party.
Maharashtra CM LIVE: BJP Observer Nirmala Sitharaman Reaches Vidhan Bhavan
BJP Observer Nirmala Sitharaman has reached Vidhan Bhavan. She will take part in party’s legislative party meet soon.
Maharashtra CM LIVE: Plans For Tomorrow's Oath-Taking
Preparations are going on in full swing for the swearing-in ceremony in Mumbai’s Azad Maidan tomorrow (December 5). According to sources, only the CM, and both deputies with take oath. CMs of all NDA-ruled states have been invited to the event. A huge number of women guests are expected as a gesture to thank them for the Ladki Behan Scheme. The ‘Ek Hain Toh Safe Hain’ slogan will be the dominant theme, with the slogan printed on t-shirts and banners. PM Modi, Union Home Minister Amit Shah, BJP President JP Nadda, and other key BJP leaders will be attending the event.
#DevendraFadnavis #MaharashtraPolitics #BJP #ElectionResults #ChiefMinister #NirmalaSitharaman #Modi #ShivSena #EknathShinde #WomenEmpowerment #PoliticalCeremony #GovernmentFormation #MaharashtraElections #Leadership #WomenInPolitics #PoliticalGathering #Unity #StateGovernment #PoliticalLeadership #MaharashtraNews