बेळगाव : शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य @कर्नाटक
Replica of Preamble to come up in 10 Karnataka cities including Belgaum
Karnataka Govt To Introduce Mandatory Reading Of Constitution's Preamble In Schools
बेळगावसह राज्यातील 10 प्रमुख शहरांतील उद्यानांमध्ये घटनेच्या प्रास्ताविकेची प्रतिकृती
कर्नाटक-belgavkar : कर्नाटक राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले.
दरम्यान, राज्यघटनेबाबत जनजागृती करण्याच्या प्रयत्नांचा एकभाग म्हणून राज्य सरकारने बेळगावसह राज्यातील १० प्रमुख शहरांतील उद्यानांमध्ये घटनेच्या प्रास्ताविकेची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, सर्व मुलांना राज्यघटना समजली पाहिजे. त्यामुळेच आम्ही शाळांमध्ये राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य करत आहोत. घटना स्वीकारून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस आपण घटना दिन म्हणून साजरा करतो. जानेवारीमध्ये राज्यघटना लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण होतील.
प्रदीर्घ काळ शांतता प्रस्थापित करणारी गोष्ट म्हणजे राज्यघटना होय. घटना कितीही चांगली असले तरी ते चांगल्या लोकांच्या हातात असेल तर ते चांगलेच आहे. जर ते वाईट लोकांच्या हातात असेल तर ते वाईट होईल, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याचे ते म्हणाले. राज्यातील दहा प्रमुख शहरांतील उद्यानांमध्ये घटनेच्या प्रास्ताविकेची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३ कोटींची तरतूद केली आहे. बंगळूर, शिमोगा, बळळारी, बेळगाव, दावणगेरे, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, मंगळूर, म्हैसूर, तुमकूर आणि विजापूर येथे ही प्रतिकृती तयार केली जात आहे. ती १० फूट उंच आणि ६ फूट रुंद असेल. कन्नड आणि इंग्रजी भाषेत ती असेल, असे समाजकल्याण विभागाचे अवर सचिव एल. नरसिंहमूर्ती यांनी सरकारी आदेशात म्हटले आहे.
The Karnataka government has made the decision to raise awareness of the Constitution on this Constitution Day. With a budget of ₹3 crore set aside for this aim, the Social Welfare Department has started a novel campaign to educate the public and spread the word about the Constitution.
The Karnataka government intends to increase knowledge about the Constitution by installing replicas of the Preamble throughout 10 cities, including Bengaluru.
#Karnataka #Belgaum #ConstitutionDay #Preamble #Education #Awareness #SocialWelfare #IndianConstitution #Schools #Colleges #GovernmentInitiative #CivicEducation #PublicAwareness #ConstitutionalValues #Democracy #YouthEngagement #CivicResponsibility #KarnatakaGovernment #CivicEducationCampaign #75YearsOfConstitution
cm karnataka
उत्तर द्याहटवा